आरोग्य

Health Information: ‘या’ सात प्रमुख लक्षणांवरून ओळखा डायबिटीस! डायबेटिस होऊच नये याकरिता काय करावे? वाचा माहिती

Health Information:- धावपळीची जीवनशैली, आहार विहाराच्या बदलत्या सवयी, प्रचंड प्रमाणात ताण तणाव इत्यादी गोष्टींमुळे अनेक शारीरिक आजार किंवा व्याधी होण्याची शक्यता आजकालच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. यामध्ये जर आपण डायबिटीस अर्थात मधुमेहाचा विचार केला तर हा एक खूप गंभीर असा आजार असून काही लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी या आजारामुळे होतो.

एवढेच नाही तर या आजारासोबत व्यक्तीला पॅरालीसीस तसेच किडनी निकामी होणे किंवा अंधत्व येणे किंवा हार्ट अटॅक यासारखे इतर धोके देखील उद्भवतात. हा एक खूप सायलेंट आजार आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या आजाराची शरीरामध्ये सुरुवात देखील होऊन जाते तरी बऱ्याच लोकांना याबाबत काहीच माहिती नसते. या अनुषंगाने या आजाराबद्दलची महत्वाची माहिती आपण या लेखात घेऊ.

 डायबिटीज प्रामुख्याने का होतो?

आपण जे काही अन्न खातो तेव्हा आपले शरीर त्या अन्नातील कार्बोहायड्रेटचे रूपांतर ग्लुकोज अर्थात साखरेमध्ये करत असते. या माध्यमातून तयार झालेली साखर स्वादुपिंडामध्ये तयार होणारे इन्सुलिन नावाच्या हार्मोन शरीरातील पेशींना ऊर्जेसाठी शोषून घेण्यासाठी मदत करत असते. परंतु जेव्हा इन्सुलिन तयार होत नाही किंवा ते व्यवस्थित काम करणे बंद करते तेव्हा डायबिटीस होतो. डायबिटीस झाल्यामुळे साखरेचे संतुलन न राहिल्यामुळे रक्तामध्ये साखर मोठ्या प्रमाणावर जमा व्हायला लागते.

 या लक्षणांवरून ओळखा डायबिटीस

1- डायबिटीस झाल्यानंतर पेशंटला खूप तहान लागते.

2- नेहमीपेक्षा जास्त वेळा लघवीला जावे लागते. ही समस्या प्रामुख्याने रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात दिसून येते.

3- तसेच अशा व्यक्तींना खूप जास्त प्रमाणामध्ये थकवा जाणवायला लागतो.

4- अशा व्यक्तीचे वजन कुठलेही प्रयत्न न करता देखील कमी व्हायला लागते.

5- तसेच कुठल्याही प्रकारचे सारखे सारखे काही इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते.

6- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिसायला देखील कमी होते किंवा दृष्टी कमी व्हायला लागते.

7- महत्त्वाचे म्हणजे जर एखादी ठिकाणी खरचटले गेले किंवा कापले गेले तर त्या जखमा लवकर भरून येत नाहीत.

 डायबेटिस होऊच नये याकरिता काय करावे?

1- डायबिटीज हा आजार प्रामुख्याने अनुवंशिक आणि पर्यावरणातील काही घटकांवर अवलंबून असतो. याकरता तुम्ही आहार हा संतुलित म्हणजेच आरोग्यदायी घ्यावा आणि सक्रिय जीवन शैलीचा अवलंब करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतात.

2- याशिवाय प्रक्रिया केलेले साखरेचे एखादे पेय किंवा पदार्थ टाळून आणि पास्ता किंवा व्हाईट ब्रेड ऐवजी धान्य किंवा व्होलमिलचा वापर करणे हे त्यासाठी महत्त्वाचे पहिले व आवश्यक असे पाऊल ठरू शकते.

3- तसेच रिफाइंड केलेली साखर किंवा धान्य यामध्ये पोषक तत्वे कमी असतात. रिफाइंड असलेल्या साखर किंवा धान्यातील तंतुमय किंवा जीवनसत्व असलेला जो काही भाग असतो तो काढून टाकलेला असतो. यामध्ये मैदा, पांढरा भात, पास्ता, पेस्ट्रीज, मिठाई किंवा साखर घातलेली नाश्ता चे पदार्थ महत्वाचे ठरतात.

4- तसेच आहारामध्ये भाजीपाला, फळे, कडधान्य, होलग्रेन यांचा समावेश असतो व ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात व तसेच फायदेशीर ठरणारे तेल, सुकामेवा आणि ओमेगा तीन ने भरपूर असलेले सार्डीन्स, सालमन असे मासे यांचा समावेश असतो.

5- महत्त्वाचे म्हणजे तुम्ही थोड्या थोड्या वेळानंतर थोडं थोडं खाने आणि पोट भरल्यानंतर ते खाणं थांबवणे हे देखील त्यामध्ये महत्त्वाचे असते.

6- व्यायाम करणे यासाठी खूप महत्त्वाचे असून यामुळे तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी ठेवू शकतात. यामध्ये वेगाने चालणे आणि पायऱ्या चढणे अशा व्यायाम प्रकारांचा समावेश होतो.

7- तसेच यामध्ये तुमचे वजन देखील साखरेचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. यामुळे वजन कमी करण्यासाठी हळूहळू प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. आठवड्याला जर तुम्ही अर्धा ते एक किलोचे वजन कमी केले तर फायद्याचे ठरते.

8- महत्वाचे म्हणजे धूम्रपान टाळणे आणि कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर लक्ष असू देणे हे देखील हृदयविकाराचा धोका टाळण्याकरिता खूप महत्त्वाचे आहे.

 डायबिटीस झाल्यामुळे कुठल्या समस्या निर्माण होतात?

डायबिटीस मध्ये जेव्हा रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा रक्तवाहिन्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये जर रक्ताचा प्रवाह योग्य होत नसेल तर यामुळे मज्जातंतूंचे नुकसान होण्याची शक्यता असते व दृष्टी देखील कमी व्हायला लागते. तसेच पायाला संसर्ग होण्याचा धोका देखील संभवतो. तसेच अंधत्व येणे, किडनी निकामी होणे, हार्ट अटॅक तसेच पॅरालिसिस इत्यादी धोके देखील संभवतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts