आरोग्य

Health Marathi News : डोक्यावरील पांढऱ्या केसांनी त्रस्त आहात का? ‘या’ भाजीच्या सालीने पांढरे केस काळे होतील; उपाय एकदा करूनच पहा

Health Marathi News : तरुण मुलामुलींना डोक्यावरील पांढऱ्या केसांमुळे बाहेर वावरताना त्रासदायक वाटते. कारण कमी वयात केस (Hair )पांढरे होणे हे साहजिकच कोणालाच बरोबर वाटत नाही.

ही समस्या (Problem) टाळण्यासाठी लोक विविध उपाय देखील करतात. पण परिणाम दिसत नाही. अशा परिस्थितीत केसांमधील काळेपणा परत आणण्यासाठी आणि नवीन केस वाढवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या (Potato) सालीचा वापर करू शकता. यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील आणि केसांचा रंग परत येईल.

बटाट्यामध्ये भरपूर पोषक असतात

बटाटे आणि त्याच्या सालींमध्येही अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्यामुळे शरीराला (Body) अनेक फायदे मिळतात. त्यात व्हिटॅमिन बी (Vitamin B) आणि व्हिटॅमिन सी(Vitamin C), व्हिटॅमिन बी-6, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि फोलेट मोठ्या प्रमाणात आढळतात.

बटाट्याच्या सालीने हेअर मास्क बनवा

बटाट्याच्या सालीचा हेअर मास्क (Hair mask) बनवण्यासाठी प्रथम बटाट्याची साले काढून टाका. ही साले थंड पाण्यात टाकून उकळा. 10 मिनिटे उकळल्यानंतर हे पाणी पूर्णपणे थंड करा. हे पाणी भांड्यात बंद करून ठेवा.

ते कसे टाकायचे

बटाट्याच्या सालीचे हे पाणी टाळूवर लावा आणि हळूहळू ५ मिनिटे मसाज करा आणि थोडावेळ राहू द्या. हे बटाट्याचे पाणी केसांवर ३० मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवा.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts