आरोग्य

Health Tips : काय? हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीराकडून मिळतात ‘हे’ संकेत, वाचू शकतात प्राण

Health Tips : सध्याच्या धावपळीच्या काळात अगदी लहान वयातही लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बदलती जीवनशैली, ताण-तणावाचे वाढणारे प्रमाण, पुरेशा व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे हृदय विकार असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

ज्यावेळी हृदयाच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा केला जात नाही, त्यावेळी ही स्थिती निर्माण होते. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले आणि वेळेवर उपचार घेतले तर तुम्हाला ह्रदय विकार नियंत्रण ठेवता येते.

सध्याच्या काळात व्यस्त जीवनशैलीमुळे, अनियमित खाणे, जंक फूडचे सेवन, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले जात आहे. दरम्यान हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, आपले शरीर काही चेतावणी देत असते, ज्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

हृदयविकाराचा झटका

हे लक्षात घ्या की मायोकार्डियल इन्फेक्शन, हेच हृदयविकाराचा झटका म्हणून ओळखण्यात येते, ज्यावेळी हृदयाच्या स्नायूच्या एका भागाला पुरेसे रक्त मिळत नाही. एका अहवालानुसार, हृदयविकाराचा झटका तीव्र उबळ किंवा कोरोनरी धमनी अचानक अरुंद झाल्यास असे होऊ शकते ज्यामुळे हृदयाच्या स्नायूमध्ये रक्त प्रवाह रोखला गेल्याने हृदयविकाराचा झटका येतो. अशातच हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी त्याची लक्षणे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

भिन्न-भिन्न लक्षणे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मतानुसार, हृदयविकार हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. प्रत्येक वर्षी हृदयविकारामुळे 1.79 कोटी लोकांचा मृत्यू होत असतो, हा खूप मोठा आकडा आहे. अस्वास्थ्यकर आहार, कमी शारीरिक हालचाल, रक्तातील साखर वाढणे, अल्कोहोलचे अतिसेवन, उच्च रक्तदाब, जादा वजन तसेच लठ्ठपणा हे हृदयविकाराची जोखीमकारक लक्षणे आहेत.

हृदयविकाराच्या सामान्य लक्षणांमध्ये छातीत दुखणे, छातीत अस्वस्थता किंवा घट्टपणा, हात श्वास लागणे, मान, पाठ किंवा खांद्यावर वेदना, मळमळ, डोके किंवा चक्कर येणे, थकवा, छातीत जळजळ/अपचन यांचा समावेश असतो. त्याशिवाय जबडा, मान किंवा पाठ, वय किंवा कौटुंबिक इतिहास, घाम यांचा समावेश असतो

या लोकांना असतो सर्वात जास्त धोका

उच्च रक्तदाब, अस्वास्थ्यकर रक्तातील कोलेस्टेरॉल, मधुमेह आणि लठ्ठपणाने त्रस्त असणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो असे तज्ज्ञांचे मत आहे. तुम्हाला हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो. त्यासाठी तुमची निरोगी जीवनशैली ठेवा, वजन नियंत्रणात ठेवा, कोलेस्ट्रॉल राखा, असे तज्ज्ञ सांगतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योगा आणि काही कार्डिओ अ‍ॅक्टिव्हिटीही कराव्या. परंतु हे लक्षात घ्या की वय किंवा कौटुंबिक इतिहास यासारखे घटक बदलता येत नाहीत, परंतु इतर घटकांवर नियंत्रण ठेवले तर रुग्णाचे प्राण वाचू शकतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts