Health Tips:- शरीराच्या संतुलित विकासासाठी व सुदृढ आरोग्याकरिता आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण असून त्याकरिता संतुलित आहाराचे सेवन हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. शरीराच्या चांगल्या आरोग्याकरिता प्रोटीन्स, वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे, खनिजे इत्यादी पोषक घटकांची नितांत आवश्यकता असते. यामध्ये जर आपण प्रोटीन्स अर्थात प्रथिनांचा विचार केला तर शरीराच्या मजबूत बांधणीकरिता आणि चांगल्या आरोग्याकरिता प्रोटीनची नितांत आवश्यकता असते.
तसेच शरीरामध्ये ऊर्जा आणि ताकद टिकून राहावी व स्नायूंचा विकास व्हावा याकरिता देखील प्रोटीन आवश्यक असते. जर आपण प्रोटीनचा स्त्रोत असलेले अन्नपदार्थ पाहिले किंवा त्याचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर पटकन चिकन किंवा अंडी येतात. कारण अंड्यांना प्रोटीनचा एक समृद्ध स्त्रोत मानले जाते. जे लोक मांसाहारी आहेत ते चिकन किंवा अंडी खातात व त्या माध्यमातून प्रोटीनची कमतरता ते भरून काढू शकतात.
परंतु असे अनेक व्यक्ती असतात की ते शाकाहारी असतात व त्यामुळे त्यांना चिकन किंवा अंडी चालत नाहीत. त्यामुळे साहजिकच अशा लोकांना प्रोटीनची गरज भागवण्याकरिता काय खावे हा एक मोठा प्रश्न पडतो? त्यामुळे वेळ न वाया घालवता हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की अंडी व चिकन व्यतिरिक्त अशी कोणती भाजी आहे की जे खाल्ल्याने तुमच्या शरीराला प्रोटीन मिळेल.
आहारात करा ब्रोकोलीचा वापर आणि शरीरासाठी मिळवा प्रोटीन
अंडी किंवा मटन, चिकन व्यतिरिक्त काही भाजीपाल्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. या प्रोटीन असलेल्या भाज्यांमध्ये ब्रोकोली ही भाजी खूप महत्त्वाची आहे. ब्रोकोलीमध्ये जितके अंड्यांमध्ये प्रोटीन असते तितक्याच प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे जे लोक मांसाहार करत नाही व शुद्ध शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी ब्रोकोली हे एक चांगले अन्न आहे.
जर आपण यूएसडीएचा विचार केला तर त्यानुसार एका अंड्यामध्ये 6g प्रोटीन असते. तर त्या तुलनेमध्ये 100 ग्रॅम ब्रोकोली मध्ये तीन ग्रॅम प्रोटीन असते. यावरून आपल्याला कळून येते की जे व्यक्ती अंडी किंवा चिकन खात नाहीत त्यांच्याकरिता ब्रोकोली ही भाजी प्रोटीनचा एक समृद्ध स्त्रोत आहे. ब्रोकोली ही एक विदेशी भाजी असून कोबी कुटुंबातील ही भाजी ओळखली जाते म्हणजेच फ्लॉवर कोबी सारखी दिसते.
प्रोटीन व्यतिरिक्त ब्रोकोलीमध्ये 34 कॅलरीज असतात आणि फॅट अजिबात नसते. त्या तुलनेत अंड्यामध्ये 78 कॅलरीज असतात व त्यामध्ये फॅट, सोडियम आणि कोलेस्टेरॉल देखील जास्त प्रमाणात असते. ब्रोकोलीमध्ये 2.6 ग्राम हेल्दी फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यास देखील ब्रोकोली साहाय्यभूत ठरते.
अंड्यामध्ये फायबर नसते व जर तुम्ही जास्त प्रमाणात अंड्यांचे सेवन करत असाल तर तुमचे वजन वाढू शकते व लठ्ठपणा येऊ शकतो. तसेच ब्रोकोली आहारात समावेश करण्याचा आणखी एक फायदा पाहिला तर यामध्ये अँटिऑक्सिडंट असल्यामुळे कर्करोगामुळे जे काही पेशींचे नुकसान होते ते आपल्याला टाळता येते.
हाडांसाठी व रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाचे
याव्यतिरिक्त शरीरातील हाडे मजबूत करायची असतील तर त्याकरिता कॅल्शियम आणि कोलेजन या घटकांची आवश्यकता असते. महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही हाडांसाठी महत्त्वाचे असलेले घटक ब्रोकोली या भाजीमध्ये असतात. याशिवाय ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के चांगल्या प्रमाणात असते व यामुळे ओस्टिओपॉरोसिसला प्रतिबंध होतो. तसेच विटामिन सी देखील ब्रोकोली मध्ये मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी त्याचा वापर करता येतो. विशेष म्हणजे ब्रोकोली खाल्ल्याने सर्दीची लक्षणे देखील कमीत कमी होतात.