आरोग्य

Health Tips: डॉ.नेनेंच्या ‘या’ पाच टिप्स दैनंदिन आयुष्यात फॉलो करा आणि टकाटक निरोगी आयुष्य जगा! वाचा तपशील

Health Tips:- सध्याचे आयुष्य हे खूप धावपळीचे आणि ताणतणावाचे झाले असून यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी मनुष्याला जडताना दिसून येत आहेत. हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजारांनी तर आता अगदी पंचविशी आणि तिशीतील तरुणांना देखील ग्रासले आहे. प्रत्येकाला या धावपळीमध्ये स्वतःकडे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्याने  त्याचा खूपच विपरीत परिणाम हा दैनंदिन आयुष्यावर होताना दिसून येत आहे. प्रत्येकाला आरोग्यपूर्ण जीवन जगायला आवडते व त्यासाठी जो तो ज्याच्या त्याच्या परीने प्रयत्न देखील करत असतो. परंतु तरीदेखील अपेक्षित परिणाम साधताना दिसून येत नाही.

या पार्श्वभूमीवरच आपण या लेखांमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती श्री राम नेने यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अशा छोट्या परंतु निरोगी आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाचे असलेल्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यांची माहिती घेणार आहोत.

 डॉ. नेनेंनी सांगितलेल्या महत्त्वाच्या टिप्स

1- भरपूर पाणी पिणे याबाबत डॉक्टर म्हणतात की पाणी प्यायल्यामुळे वजन नियंत्रणात राहते व पाण्यामुळे पचन संस्था सुधारण्यास देखील खूप मोठी मदत होते. तसेच आपण जे काही अन्न खातो ते देखील व्यवस्थित पचते. भरपूर पाणी पिल्यामुळे शरीरातील जी काही घाण असते ती निघून जाते व त्वचेवर देखील चमक येते. पुरुषांनी 3.7 लिटर व महिलांनी 2.7 लिटर पाणी दररोज प्यावे.

2- संतुलित आहाराचे सेवन धावपळीच्या जीवनामध्ये बाहेर काही खाण्याऐवजी संतुलित आहार घेण्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आहारामध्ये प्रोटीन, चांगले फॅट्स तसेच कार्बोहायड्रेट्स अर्थात कर्बोदके, जीवनसत्वे आणि खनिज या पौष्टिक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. नियमितपणे जर संतुलित व सकस आहार घेतला तर ब्लड प्रेशर तसेच डायबिटीस आणि कर्करोग सारख्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

3- वर्कआउट करणे गरजेचे बाहेरचे काही खाल्ल्यामुळे बऱ्याचदा वजन वाढण्याची समस्या उद्भवते व वजन वाढल्याने इतर गंभीर आजार देखील निर्माण होतात. त्यामुळे नियमितपणे व्यायाम करायला हवा व असे केल्याने वजन तर कमी होतेच. परंतु एनर्जी बूस्ट होण्यास देखील मदत होते. त्यामुळे कमीत कमी दिवसा नियमितपणे एक तास व्यायाम करणे गरजेचे आहे.

4- आराम करणे महत्त्वाचे झोप ही चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असून जर पूर्णपणे झोप झाली तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम हा शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो व आरोग्य सुधारण्यास मदत होते. झोप जर कमी झाली तर त्यामुळे तणाव तसेच कॉन्सन्ट्रेशन कमी होते. आरोग्याविषयी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दररोज नियमितपणे आठ तासांची झोप घेणे गरजेचे आहे व यामुळे ऊर्जा व शरीराची कार्यक्षमता सुधारते.

5- ध्यानधारणा करणे आजकाल प्रत्येक जण धावपळीच्या आणि तणावाच्या आयुष्यात जगत असून प्रचंड असा तणाव हा शरीरावर आणि मनावर असतो. या तणावाचा  खूपच निगेटिव्ह इम्पॅक्ट हा आरोग्यावर होत असतो. त्यामुळे हा तनाव कमी करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे व तो कमी करण्याकरिता योग किंवा मेडिटेशन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे नियमितपणे मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा केल्याने हृदय देखील उत्तमरीत्या कार्यरत राहते व मानसिक आरोग्य देखील सुधारते.

अशाप्रकारे या पाच साध्या व सोप्या टिप्स जर अवलंबल्या तर नक्कीच निरोगी आयुष्य जगण्यासाठी मदत होईल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts