आरोग्य

Health Tips: जर तुम्हाला देखील असतील ‘या’ चुकीच्या सवयी तर हार्ट अटॅकला द्याल निमंत्रण! वेळीच करा बदल

Health Tips:- सध्या दैनंदिन धावपळीचे जीवन आणि चुकीची आहारपद्धती इत्यादीमुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांनी व्यक्तींना ग्रासले असून आरोग्याच्या बाबतीत अनेक मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. अगदी झोपेपासून तर जेवण्यापर्यंतच्या अनेक सवयी बदलल्या असल्यामुळे या चुकीच्या सवयींचा परिणाम हा मानवाच्या आरोग्यावर होताना आपल्याला दिसून येत आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह आणि इतकेच नाहीतर कर्करोगासारख्या आजारांनी देखील आता मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. त्यातल्या त्यात हार्ट अटॅकचे प्रमाण गेल्या काही वर्षापासून भारतामध्ये सातत्याने वाढताना दिसून येत असून

अगदी 25 ते 40 वर्षे वयोगटातील युवकांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर हार्टअटॅकचे प्रमाण वाढू लागले आहे.या सर्व परिस्थितीला काही चुकीच्या सवयी कारणीभूत असून नेमक्या या कोणत्या चुकीच्या सवयी आहेत की यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढू लागले आहे. यासंबंधीचीच माहिती या लेखात बघू.

 या चुकीच्या सवयी सोडा आणि हार्ट अटॅक पासून वाचा

1- आपल्यापैकी बऱ्याच जणांना डेस्क जॉब म्हणजेच एका ठिकाणी बसून काम असते. त्यामुळे शरीराची हालचाल खूप कमी व्हायला लागते. यामुळे हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

2- त्यासोबतच गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड फुड, जास्त फॅट असलेले पदार्थ खाणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे व त्यामुळे स्थूलपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलचे पातळी वाढणे आणि उच्च रक्तदाब असे आजार वाढू लागले आहे व यामुळे हृदयविकाराला चालना मिळताना दिसून येत आहे.

3- तसेच सध्या डायबिटीसचे प्रमाण वाढताना दिसून येत असून दिवसेंदिवस रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे. डायबिटीज हे हृदयविकाराचे सगळ्यात मोठे कारण असल्यामुळे डायबिटीस नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

4- तसेच आर्थिक समस्या व कामाचा ताण-तणाव इत्यादीमुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये चिंता आणि तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून यामुळे देखील हृदयविकारात वाढ होताना दिसून येत आहे.

5- तसेच काही लोकांच्या कुटुंबामध्ये हार्ट अटॅकची हिस्ट्री असते. यामुळे अनुवंशिक रित्या हा आजार पुढच्या पिढीमध्ये देखील होण्याची शक्यता असते. जर कुटुंबामध्ये अशाप्रकारे हृदयविकाराचा इतिहास असेल तर अशा व्यक्तींनी अधून मधून आरोग्याची तपासणी करून आवश्यक चाचण्या करून घेणे गरजेचे आहे.

6- तसेच सध्या दिवसेंदिवस तंबाखूचे सेवन सिगरेट सारखे धुम्रपानाच्या सवयीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. हृदयाच्या संबंधित जे काही आजार होतात त्याची या दोन व्यसनांशी खूप मोठा संबंध आहे. त्यामुळे चुकून देखील तंबाखूची किंवा धूम्रपणाची सवय लावून घेऊ नका आणि असेल तर ती लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा.

 या गोष्टी करा आणि हृदयरोग टाळा

तुम्हाला जर हृदयरोग टाळायचा असेल तर उच्च रक्तदाब तसेच साखरेची पातळी व वजन नियंत्रित ठेवणे खूप गरजेचे आहे तसेच तुमचे खाण्यापिण्याच्या वेळा तसेच सवयी इत्यादी बाबत देखील काळजीपूर्वक लक्ष द्यावे. आहार हा पोषक व संतुलित असावा तसेच दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. धूम्रपानापासून दोन हात लांब राहावे यासोबतच आहारामध्ये कमी तेलाचा वापर करावा व त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणार नाही याची काळजी घ्यावी. तुम्ही निरोगी असाल तरी देखील नियमित तपासण्या करून घ्यायला हव्यात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts