Health Tips:- बऱ्याचदा आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा जेवण केल्यानंतर पोटामध्ये एकदम हेवी म्हणजेच जड वाटते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले म्हणजे पोट फुगल्यासारखे होते व एकदम सुस्त वाटायला लागते. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साधे हलके पदार्थ खाल्ल्यामुळे देखील पोटाचे अनेक समस्या निर्माण होतात.
यामध्ये अनेकांना छातीत जळजळ होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आंबट ढेकर येणे, गॅस होणे तसेच अपचनाची समस्या व बद्धकोष्ठता इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे भूक लागून देखील जेवण करायची इच्छा होत नाही. उन्हाळ्यामध्ये जर पोट निरोगी ठेवायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
उन्हाळ्याच्या कालावधीत पोटाचे विकार झाल्यास काही घरगुती उपाय खूप महत्त्वाचे ठरतात व याबद्दलची माहिती प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे व त्यानुसार आपण ती माहिती बघू.
हे पदार्थ खा आणि पोट हलके ठेवा
1-आल्याचा रस– बऱ्याच जणांना पोटाच्या विकारांची समस्या असते. अशा प्रकारचा त्रास असेल तर आल्याचा रस त्यावर गुणकारी ठरतो. कारण आल्याच्या रसामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात व त्यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते व त्यासोबतच गॅस्ट्रो एसोफेजल रिफ्लेक्सला सुद्धा कमी करण्यास मदत करते. तसेच त्यासोबत उलट्या होणे आणि मळमळची समस्या देखील कमी करण्यास मदत करते.
2- ताकाचे सेवन– ताक पोटासाठी अमृतासमान असून ते चवीला आंबट असले तरी पचनक्रिया वेगाने होण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते. ताकाचे जिवाणू हे प्रोबायोटिक असतात व त्यामुळे आपल्याला तंदुरुस्त राहण्यास मदत होते. शरीरामध्ये ज्या काही जास्तीच्या कॅलरीज असतात त्या बर्न करण्यासाठी देखील रोज ताक पिणे फायद्याचे ठरू शकते.
3- रॉक शुगरचा( खडीसाखर) वापर– रॉक शुगर हा साखरेचा सर्वात प्युअर म्हणजे शुद्ध प्रकार असून साधारणपणे याचा वापर आपण मुखवासा करिता करतो. परंतु या साखरेच्या वापराने अन्नाचे देखील व्यवस्थित पचन होण्यास मदत होते. जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर जर खाल्ली तर अन्न पचायला मदत होते व पचण्याच्या संबंधित ज्या काही समस्या असतात त्या कमी होतात.
4- तूप– तूपाचे सेवन केले तर आरोग्यासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरते. तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ए आढळून येते व त्याशिवाय तुपामध्ये असलेले इतर पौष्टिक घटकांमुळे पचन संस्था देखील निरोगी राहण्यास मदत होते. तसेच मुळव्याध आणि बद्धकोष्ठतेसारखा त्रास देखील होत नाही.
5- बडीशोप, धने आणि जिऱ्याचा चहा– पोट फुगण्याची समस्या असेल तर जिरे, धने आणि बडीशेप घालून केलेला चहा दिला तर मोठ्या प्रमाणावर आराम मिळतो. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात ठेवायला मदत होते. हे चहा बनवण्यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यावे
व त्याला गरम करण्यासाठी ठेवावे. या पाण्यामध्ये एक चमचा जिरे, एक चमचा धने आणि बडीशेप घालून चांगले मिक्स करून घ्यावे व पाच मिनिटांसाठी ते मिश्रण उकळून घ्यावे. खोकल्यावर नंतर ते गाळून प्यावे. यामुळे गॅसची समस्या मिटते किंवा टळण्यास मदत होते.