आरोग्य

Health Tips: आरोग्यासाठी सूर्यफूल तेल चांगले की शेंगदाणा तेल? वाचा काय सांगतात तज्ञ?

Health Tips:- आरोग्य सुदृढ राहण्याकरिता आपल्याला संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते हे अटळ सत्य आहे. संतुलित आहारामध्ये आपण विविध प्रकारचा भाजीपाला, डाळी तसेच अंडी, मासे, मोड आलेले कडधान्य इत्यादी खाद्यपदार्थांचा अवलंब करत असतो. परंतु हे खाद्यपदार्थ खाण्याच्या लायक बनवण्याकरिता आपल्याला त्यामध्ये  तेलाचा वापर करणे आवश्यक असते.

साधारणपणे तेल हे शेंगदाणा तेल किंवा सोयाबीन तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर प्रत्येक घरात केला जातो. त्या खालोखाल सूर्यफूल तेलाचा वापर देखील बऱ्याच घरांमध्ये होत असतो. चमचमीत पदार्थ तयार करण्यासाठी किंवा तळलेले पदार्थांसाठी तेल हा एक आवश्यक घटक आहे.

आपण कधी विचार केला आहे की जेव्हा आपण शेंगदाणा तेल किंवा सूर्यफूल तेल वापरतो. या दोघांमधून आरोग्यासाठी कोणते तेल चांगले आहे व या तेलांचे आरोग्यासाठी फायदे कोणते आहेत? याबद्दलचेच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 काय आहे याबाबतीत तज्ञांचे मत?

1- सूर्यफूल तेल जर आपण पोषणतज्ञ स्वपान बॅनर्जी यांचे मत पाहिले तर त्यांच्या मते सूर्यफूल तेल हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्सचा एक मोठा स्त्रोत असून हृदय निरोगी ठेवण्यासाठी ते खूप मोठ्या प्रमाणावर मदत करते. तसेच शरीरासाठी घातक असलेले बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील याची मदत होते.

सूर्यफूल तेलामध्ये जीवनसत्वाचे प्रमाण पाहिले तर विटामिन बी 1, विटामिन ई, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, जस्त, लोह, फोलेट आणि मॅग्नीज यासारखे महत्त्वाचे पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात. सूर्यफूल तेल हे दमा तसेच हाय ब्लडप्रेशर आणि हृदयरोग इत्यादी आजारांचा धोका कमी करण्याला मदत करते. म्हणजेच या अर्थी जर पाहिले तर सूर्यफूल तेल देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

2- शेंगदाणा तेल त्यांच्या मते शेंगदाणा तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात व त्यामुळे हृदयविकारांपासून संरक्षण मिळते. त्यासोबतच शेंगदाण्याच्या तेलामध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, विटामिन ई, बी 6 जीवनसत्वे, कॅल्शियम, जस्त आणि तांबे मोठ्या प्रमाणावर आढळते.

शेंगदाणा तेलाचे तुम्ही नियमितपणे सेवन करत असाल तर शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच स्मरणशक्ती वाढणे, लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग आणि नैराश्य यासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. महत्वाचे म्हणजे रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित व नियंत्रणात ठेवून आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शेंगदाणा तेलाची खूप मोठी मदत होते.

यावरून आपल्याला दिसून येते की दोनही प्रकारचे तेल हे शरीरासाठी खूप चांगले आहेत. परंतु आहारामध्ये तेलाचे प्रमाण जास्त ठेवू नये हे देखील तितकेच खरे आहे. जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा आजार असेल तर तुम्ही तेलाची निवड करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts