Heart Attack : जगात सर्वात जास्त मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होत असतात. याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचे कारण हे वेगळे असू शकते.
अशा वेळी आता मात्र एक वेगळीच माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये देशात तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार सोमवार तुमच्या हृदयासाठी वाईट असू शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की मायोकार्डियल इन्फेक्शन (STEMI) होण्याची शक्यता आठवड्यातील इतर दिवसांपेक्षा सोमवारी जास्त असते.
पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे का? तर याचे उत्तरही तुम्ही जाणून घ्या. ही नवीन प्रथा ब्रिटीश कार्डिओव्हस्कुलर सोसायटीच्या कौन्सिलमध्ये सादर करण्यात आली होती, ज्यामध्ये कार्डियाक अरेस्टची वेळ आणि कारणे यावर सुधारणा करण्यात आल्या होत्या.
ज्यामध्ये 2005 च्या अभ्यासात असेही आढळून आले की ‘ब्लू मंडे’च्या दिवशी पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते दारूच्या सेवनामुळे होत आहे हे याचे प्रमुख कारण आहे.
संशोधक काय म्हणतात?
ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक प्रोफेसर सर नीलेश सामानी यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आता आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की सोमवारी हृदयविकाराचा झटका येण्याचे नेमके काय कारण असू शकते.
कारण काय आहे?
तज्ज्ञांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार, याचे कारण असे आहे की सोमवारी लोकांमध्ये तणाव अधिक असतो. ज्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका येत असतो. याबाबत हेल्थ अँड सोशल केअर ट्रस्टचे कार्डिओलॉजिस्ट डॉ जॅक लाफन म्हणाले की कामावर परत येण्याच्या तणावामुळे असे होऊ शकते. इतकेच नाही तर वाढलेल्या तणावामुळे स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
हृदयविकाराचा झटका कधी येतो?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, STEMI किंवा ST-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन हा एक प्रकारचा हृदयविकाराचा झटका आहे जो हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या दोन धमन्यांपैकी एक ब्लॉक होतो आणि या ब्लॉकेजमुळे हृदयाचे स्नायू आकुंचन पावतात. ज्यामुळे तुमच्या नसा ब्लॉक होऊन हृदयविकाराचा झटका येतो.
उपचार काय आहे?
यावर सामान्यतः आपत्कालीन अँजिओप्लास्टीने उपचार केले जातात. या उपचारात ब्लॉक नसांवर उपचार केला जातो. ज्यामुळे रुग्ण वाचण्याची शक्यता अधिक आहे. हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे इमर्जन्सी वॉर्डमध्ये येणाऱ्या सुमारे 38% रुग्णांवर अँजिओप्लास्टीद्वारे STEMI वर उपचार केले जातात.