High cholesterol : ज्यावेळी रक्तात जास्त कोलेस्टेरॉल असते त्यावेळी उच्च कोलेस्टेरॉलची समस्या निर्माण होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी चांगला आहार खूप महत्त्वाचा आहे. कारण उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह यांसारख्या समस्या निर्माण होतात.
कोलेस्टेरॉल वाढणे ही गंभीर समस्या असून त्यावर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. जर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही चांगला आहार आणि व्यायाम खूप गरजेचा आहे. समजा तुम्हाला फॅटी लिव्हर, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबाची समस्या असल्यास तुम्ही या सर्व गोष्टींपासून दूर राहा.
कारण आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार, तुम्ही सकाळी जे काही खाता ते तुमच्या शरीराला ताकद देत नाही तर त्यामुळे फक्त दिवसभर पोट भरते. त्यामुळे नाश्त्यामध्ये उच्च प्रथिने, उच्च फायबरचा समावेश करणे महत्वाचे आहे ज्यामुळे तुमची कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात राहील.
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असून तो आपल्या रक्तात असतो. ज्यावेळी कोलेस्ट्रॉलची पातळी 200 mg/dL पेक्षा जास्त असेल त्यावेळी तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉलच्या समस्येचा सामना करावा लागतो.
रक्तामध्ये दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असते एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल तर दुसरे म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल. त्यापैकी खराब कोलेस्टेरॉल अतिशय धोकादायक असते. जर धमन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर रक्त योग्य प्रमाणात हृदयापर्यंत जात नाही आणि असे झाले तर हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
जर तुम्ही काही पदार्थ रोज सकाळी खाल्ले तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
ओट्स –
नाश्त्यामध्ये ओट्स खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. यात तुम्हाला भरपूर फळेही टाकता येतात. त्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहून तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरघळणारे फायबर असल्याने ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
बेरी-
बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि सॉल्युबल फायबर असल्याने त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. इतकेच नाही तर तुम्ही त्यांची स्मूदी बनवून पिऊ शकता.
एवोकॅडो-
एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असल्याने त्यामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. जर तुम्ही सकाळच्या नाश्त्यात एवोकॅडोचे सेवन केले तर तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
अंडी-
यामुळे उच्च प्रथिने आणि हेल्दी फॅट्स कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत होते. परंतु हे लक्षात ठेवा की अंडी खात असताना त्याच्या आतील पिवळा भाग जास्त न खाण्याचा प्रयत्न करा.
दही-
प्रथिने आणि प्रोबायोटिक्सने समृद्ध असणारे दही केवळ तुमच्या पोटासाठी चांगले नसून ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.