आरोग्य

Home Remedies On Kidney Stones: घरगुती उपाय करा आणि किडनी स्टोन दूर पळवा! वाचा ए टू झेड माहिती

Home Remedies On Kidney Stones:- बऱ्याच जणांना अनेक प्रकारच्या व्याधी असतात. या व्याधी प्रामुख्याने चुकीच्या सवयी तसेच चुकीचा दैनंदिन रुटीन इत्यादीमुळे उद्भवतात. प्रामुख्याने धावपळीचे जीवनशैली तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी  इत्यादीमुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या कित्येक जणांना उद्भवलेले आपण पाहतो.

त्यामुळे साहजिकच पर्यायाने हॉस्पिटल शिवाय पर्याय नसतो आणि एकदा जर हॉस्पिटल सुरू झाले तर मात्र खर्च तर होतोच परंतु मानसिक त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळे बरेच जण हॉस्पिटलचा पर्याय तर स्वीकारतात परंतु त्या व्यतिरिक्त काही घरगुती उपायांच्या माध्यमातून देखील अशा समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

यामध्ये जर आपण किडनी स्टोनचा विचार केला तर ही समस्या आता कित्येक लोकांना दिसून येते. या समस्या मध्ये लघवी करायला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो व सतत पोटात दुखत राहते. त्यामुळे अनेक जण हॉस्पिटलचा आधार घेतातच परंतु अनेक घरगुती उपाय देखील करतात.

याकरिता दवाखान्यांमध्ये देखील अनेक प्रकारच्या उपचार उपलब्ध असून ऑपरेशनच्या माध्यमातून किडनी स्टोनची समस्या दूर होते. परंतु यामध्ये जर तुम्ही काही घरगुती उपायांचा विचार केला तर यामध्ये किडनी स्टोन पासून आराम मिळू शकतो. त्यामुळे आपण कोणते घरगुती उपाय यावर रामबाण ठरतात त्या विषयी माहिती घेऊ.

 किडनी स्टोनवर महत्त्वाचे असे घरगुती उपाय

1- डाळिंबाचा वापर डाळिंबाचा रस आणि बियांमध्ये एस्ट्रीजेंट गुण असतात व ते किडनी स्टोन वर उपचाराकरिता खूप फायद्याचे ठरतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावे किंवा त्याचा रस आणि बियांनी देखील खूप मोठा फायदा होतो. तसेच तुम्ही डाळिंबाला फ्रुट सॅलड मध्ये देखील मिश्रित करून खाऊ शकतात.

2- कलिंगडचा वापर जर आपण किडनी स्टोनचा विचार केला तर प्रामुख्याने मॅग्नेशियम, फॉस्फेट, कार्बोनेट आणि कॅल्शियम पासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचाराकरिता कलिंगडचा देखील खूप मोठा फायदा मिळतो. कलिंगड मध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम असते व जे किडनी करिता खूप उपयुक्त ठरते.

पोटॅशियम लघवीतील ॲसिड लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करते. पोटॅशियम  सोबतच कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असते व त्यामुळे किडनी स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराच्या बाहेर काढायला मदत मिळते.

3- लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑइल लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिश्रित करून गॉल ब्लेडरच्या स्टोनसाठी सेवन केले जाते. परंतु हा उपाय किडनी स्टोन साठी देखील खूप महत्त्वाचा ठरतो. लिंबाच्या रसामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड मध्ये कॅल्शियम बेस असलेला स्टोनला तोडण्याची क्षमता असते.

त्यामुळे नवीन स्टोन किडनीमध्ये तयार होतं नाही. हे मिश्रण तयार करायचे असेल तर लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑइल सारख्या प्रमाणामध्ये मिश्रण करावे आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करावे.

4- राजमाचा वापर राजम्यामध्ये देखील फायबरचे प्रमाण जास्त असते. राजम्याला किडनी बीन्स म्हणून देखील ओळखतात. राजमा किडनी आणि ब्लेडर्स संबंधित अनेक आजारांवर उपचाराकरिता खूप फायद्याचा ठरतो. या पाण्यामध्ये राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी जर पिले तरी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts