Important Alert:- सध्या जर आपण पाहिले तर खाद्यपदार्थांमधील भेसळ हा एक ज्वलंत प्रश्न असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ ही घातक असते. आपल्याकडे तर दुग्धजन्य पदार्थ आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते व अशा अनेक प्रकरणे मागील काही महिन्यांपासून उघडकिस देखील आलेली आहे.
खाद्यपदार्थांमध्ये जर भेसळ केली तर याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याकारणाने याबाबतीत सतर्क राहणे खूप गरजेचे आहे. आतापर्यंत आपण भेसळीची अनेक उदाहरणे ऐकले असतील. परंतु दुधा व्यतिरिक्त लसणासारख्या पदार्थ देखील विषारी असू शकतो हे आपण याआधी कधी ऐकलेले नसेल.
परंतु चीन या देशाचा विचार केला तर जगातील हा देश कुठल्याही प्रकारचे बनावट असलेले साहित्य तयार करू शकतो हे आपल्याला माहिती आहे व त्या दृष्टिकोनातून चीनची संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. याच दृष्टिकोनातून आता चीनमध्ये बनावट लसूण किंवा विषारी लसूण तयार केला जात आहे
अशा पद्धतीची एक शंका घेतली जात असून सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये चीन मधून जो काही बनावट लसूण निर्यात केला जातो त्यासंदर्भात इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमके हे प्रकरण काय आहे याविषयी आपण या लेखात माहिती घेऊ.
काय आहे नेमके हे प्रकरण?
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, चीन बनावट लसूण तयार करत आहे की काय याबाबत शंका घेतली जात असून यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे व यामध्ये चीन मधून जो काही लसूण निर्यात केला जातो तो बनावट लसून असून त्या संदर्भात इशारा देण्यात आलेला आहे.
विशेष म्हणजे बाजारामध्ये विकला जाणारा हा बनावट लसूण भारतातील लाखो ते करोडो घरामध्ये खाल्ला जात असल्याचा धक्कादायक खुलासा देखील यामध्ये करण्यात आलेला आहे. या लसणाचे वैशिष्ट्य पाहिले तर तो दिसायला फारच पांढरा आणि ताजा तवांना दिसतो.
परंतु आरोग्यासाठी मात्र हा त्रासदायक ठरू शकतो. विशेष म्हणजे या लसणासाठी नाल्यातील पाण्याचा वापर केला जातो आणि लिड व अन्य धातू कणाच्या माध्यमातून या लसणाची वाढ अधिक मोठी व्हावी म्हणून त्याला स्वच्छ पाणी दिले जाते. विशेष म्हणजे हा लसूण जास्त पांढरा शुभ्र दिसावा याकरिता चक्क क्लोरीनचा देखील वापर केला जातो.
अमेरिकेकडून चौकशीची
मागणीयाबाबत अमेरिकेने देखील आक्षेप घेतला असून त्या ठिकाणच्या एका खासदाराने चीन मधून लसणाच्या आयात करणे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने किती घातक आहे संदर्भाचा तपास सरकारने करावा अशी मागणी केलेली आहे. रिपब्लिकन सीनेट रिक स्कॉट यांनी वाणिज्य सचिवांना याबाबत पत्र व्यवहार केला असून यामध्ये आयात केल्या जाणाऱ्या लसणाचे अयोग्य पद्धतीने उत्पादन घेतले जात असल्याचा संदर्भ देत चिनी लसूण असुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
लसणाच्या बाबतीत विचार केला तर चीन हा सर्वात मोठा निर्यात करणारा देश असून अमेरिका चीन मधून मोठ्या प्रमाणावर लसणाची आयात करतो. परंतु आता लसणाच्या व्यापारावरून यामध्ये अनेकदा वाद झाले आहेत.
एवढेच नाही तर अमेरिकेने चीनवर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये लसूण बाजारामध्ये डम्प करण्याचा आरोप देखील केला आहे. 1990 च्या दशकापासून अमेरिकेने अमेरिकन उत्पादने बाजारपेठेमधून बाहेर पडू नयेत याकरिता चीनी वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आयात कर लावला होता व हा कर 2019 मध्ये रद्द करण्यात आला आहे.
कसा ओळखावा हा चिनी लसूण?
तुमच्या घरामध्ये वापरात असलेला लसुन चीनमधील बनावट लसूण तर नाही तुम्ही अगदी साध्या पद्धतीने ओळखू शकता. बाजारामध्ये जो काही बनावट लसूण विकला जातो तो अधिक पांढरा असतो व या लसणावर कोणत्याही प्रकारचे डाग नसतात. जर लसणाच्या खालील भागावर डाग दिसले तर हा चिनी लसूण नाही असं समजावे. परंतु लसणाच्या अगदी खालच्या बुडाला देखील पांढरा असेल तर नक्कीच हा विषारी चिनी लसूण आहे असे समजावे.