आरोग्य

Good Sleep : रात्री पायात सॉक्स घालून झोपणे योग्य आहे का ? जाणून घ्या संशोधनातून समोर आलेली माहिती…

Good Sleep : पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांना रात्री झोपताना पायात सॉक्स घालून झोपायची सवय असते. मात्र, असे करणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, असे एका संशोधनातून आढळून आले आहे.

कारण आपण भारतीय ज्याला पाय पुसणे म्हणतो, त्या डोअरमॅटवर जेवढे जिवाणू असतात तेवढे किंवा त्याहून जास्त जिवाणू आपल्या सॉक्समध्ये असतात.

दिवसभर कामाच्या ठिकाणी सॉक्स घालून वावरल्यानंतर तेच सॉक्स रात्री झोपतानाही जर पायात ठेवणार असाल तर तुम्हाला गंभीर आजारांचे संक्रमण होऊ शकते, असा धोक्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

संशोधनातून असे आढळून आले आहे की, आपल्या घरातील डोअरमॅट (पायपुसणे) तसेच टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्टेरिया असतात, त्याहून जास्त बॅक्टेरिया दिवसभर वापरलेल्या सॉक्समध्ये असतात. याची तुलना वैज्ञानिकांनी झुरळांच्या विष्ठेमध्ये असलेल्या बॅक्टेरियांशी केली आहे.

याचा अर्थ असा की, दिवसभर आपण जे सॉक्स घालून वावरतो तेच सॉक्स जर रात्री झोपतानाही आपण पायात ठेवणार असू तर त्यामुळे रात्रभर तुम्ही घातक बॅक्टेरियांच्या संपर्कात रहाल.

ज्याने तुम्हाला घातक संक्रमण होऊ शकते. थंड वातावरणामध्ये किंवा एअरकंडिशन्ड खोल्यांमध्ये झोपायची सवय असलेल्या लोकांना रात्री झोपताना सॉक्स घालण्याने शांत झोप लागते असे ‘स्लीप एक्सपर्टस्’ सांगतात.

मात्र, तेही असा सल्ला देतात की, रात्री झोपताना पायात जे सॉक्स घालाल ते स्वच्छ असायला हवेत. म्हणजे दिवसभर वापरलेले सॉक्स पायात ठेवून झोपणे हे आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: good sleep

Recent Posts