आरोग्य

High blood pressure : मिठाचे सेवन करण्याआधी ही बातमी वाचाच ! उच्च रक्तदाब विकार…

High blood pressure : उच्च रक्तदाब विकार जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या एका ताज्या अहवालामध्ये उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या प्रत्येक पाचपैकी चार रुग्णांवर पुरेसे उपचार केले जात नाहीत, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

विविध देशांनी उच्च रक्तदाब उपचारांची व्याप्ती वाढवली तर आतापासून ते २०५० पर्यंत उच्च रक्तदाबाशी संबंधित सुमारे ७.६ लोकांचे प्राण वाचवता येऊ शकतील, याकडे अहवालामध्ये लक्ष वेधण्यात आले आहे.

उच्च रक्तदाब उपचारांमध्ये सुधारणा केल्यास या कालावधीत १२ कोटी मेंदूघात, ७.९ कोटी हृदयविकाराचा झटका आणि १.७ कोटी हृदयाशी संबंधित घटना टाळता येतील. उच्च रक्तदाबाला अनेकदा ‘सायलेंट किलर’ असे म्हटले जाते.

उच्च रक्तदाब झाला आहे, हे लक्षात येईपर्यंत बऱ्याचदा हृदय, रक्तवाहिन्या आणि इतर अवयवांचे लक्षणीय नुकसान झालेले असते, असे नोएडामधील फोर्टिस हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजीचे अध्यक्ष अजय कौल यांनी सांगितले.

उच्च रक्तदाब असलेल्यांची संख्या रक्तदाब १४०/९० किंवा त्याहून अधिक आहे किंवा उच्च रक्तदाबासाठी औषधे घेत आहेत, अशा रुग्णांची संख्या १९९० ते २०१९ मध्ये असलेल्या ६५ कोटींवरून १.३ अब्जवर गेली आहे.

जागतिक स्तरावर उच्च रक्तदाब असलेल्या जवळपास निम्मे लोक त्यांना झालेल्या विकाराबद्दल अनभिज्ञ असतात. उच्च रक्तदाब असलेले तीन चतुर्थांश प्रौढ लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात, याकडे अहवालामध्ये लक्ष वेधण्यात आले आहे.

कळत नकळत वर्षानुवर्षे उच्च रक्तदाब असू शकतो. त्यामुळे हृदयविकार, किडनी समस्या आणि इतर गंभीर आरोग्याच्या गुंतागुंत होऊ शकतात. याचा नकळतपणे लोकांवर आघात होतो, असे मॅक्स, काथ लॅब, कार्डियाक सायन्सेसचे संचालक आणि प्रमुख विवेक कुमार यांनी सांगितले.

शारीरिक हालचालीचा अभाव, उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास, बाह्य ताण आणि लठ्ठपणा तसेच जास्त मद्यपान याबरोबरच मिठाचे सेवन हा उच्च रक्तदाबाचा धोका वाढवणारा एक महत्त्वाचा घटक असल्याचे हृदयरोगतज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय खाद्यपदार्थ आणि खाण्याच्या सवयींमध्ये जास्त प्रमाणात मिठाचा समावेश होतो आणि जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या शिफारशीच्या प्रमाणात हे जवळपास १० पट जास्त आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts