दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चाले आहे. विवाह सभारंभ, गावोगाव सुरु झालेल्या जत्रांमुळे नागरिकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र यंदाचा उन्हाळा अधिकच कडक असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे गरजेचे असल्याचे विविध तज्ज्ञ डॉक्टर सल्ला देत आहेत.
वातावरणाच्या तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक टिकाणी तर पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. ऊन अधिक लागल्याने बरेच लोक आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. उष्णतेमुळे व अति ऊन लागल्याने शरीरातील पाणी कमी होते.
पाणी कमी झाले की, उष्माघाताचा त्रास होतो. हा होणारा धोका टाळण्यासाठी, उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचेच आहे. याचा त्रास तुम्हाला अनेक धोकादायक गोष्टींना तोंड द्यायला लावू शकतो.
काही तज्ज्ञ डॉक्टर सांगतात, उष्णतेमुळे होणाऱ्या गंभीर स्वरूपाचा शारीरिक त्रास म्हणजे उष्माघात. यामध्ये व्यक्तीचा मृत्यूदेखील होऊ शकतो. उष्माघात झाल्यास रुग्णाला उच्चताप येऊन त्वचा गरम आणि कोरडी होऊ शकते.
उन्हाळ्यात प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचेच आहे असे आवाहन सध्या आरोग्य विभाग करत आहे.
काय काळजी घ्यावी ?
– शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे
– तहान लागो अथवा न लागो जस्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे
– सरबत, तांदळाची पेज, ताक, फळांचा ज्यूस पेय घ्यावे
– चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिक टाळणे
– हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत
– बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोक्यावर टोपी हवी
नगरचा पारा ४० अंशाच्या पुढे
राज्यभरात सध्या उष्णता वाढली असून अहमदनगर जिल्ह्यासह ११ जिल्ह्यांचा पारा ४० अंशाच्या पुढे गेल्याने उष्णता वाढली आहे. नगरमध्ये मंगळवारी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान ही उष्णता आणखी
काही दिवस राहणार असून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता देखील वेधशाळेने वर्तवली आहे. विदर्भातही मोठी तापमान वाढ पाहायला मिळत आहे.