Health Tips In Marathi
१. फूड हॅबिट्स मध्ये बदल करा – व्हिटॅमिन-सी फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारणे. सफरचंदात व्हिटॅमिन -सीचे उच्च प्रमाण आढळते. हे अँटिऑक्सिडेंट च्या रूपात काम करते.
याप्रमाणेच बीटामध्ये नायट्रेट्स असतात. हे ब्लड प्रेशर नियंत्रित करते. ज्यांना फुफ्फुसांसंबंधित आजार असतील त्यांच्यासाठी बीट खाणे फायदेशी आढळले आहे.
टोमॅटो लायकोपीन सर्वांत चांगला स्रोत असतो. रोज २-३ कप ग्रीन टी घेणे फुफ्फुसे सुदृढ ठेवण्याची उत्तम पद्धत आहे.
२. स्मोकिंग सोडा – स्मोकिंग लंग कॅन्सरचा धोका वाढतात. जर आपण रोज एक सिगारेटही ओढत असाल, तर हजारो केमिकल, निकोटिन ब टार आपल्या फुफ्फुसा पर्यंत पोहोचत असतात.
हे लंग्जना लवकर वृद्ध करतात. अमेरिकन संस्था सीडीसीनुसार सिगारेट ओढल्याने एवढ्या अमेरिकनांचा मृत्यू झाला आहे जेवढा अमेरिकेने लढलेल्या कोणत्याही लढाईत झालेला नाही.
कोविड-१९ फुफ्फुसांवर सर्वात जास्त परिणाम करतो, पण हास्य व श्वसनपद्धत त्यांना स्ट्रॉग बनवू शकतात. जीवनशैलीत हे सहा बदल केल्यास तुमची फुफ्फुसे मजबूत होतील.
३. एक्सरसाइज सुरू करा – जेव्हा आपण एक्सरसाइज करता, तेव्हा आपला श्वास दर मिनिटाला १५ ते ४0 पट वाढतो. हे लंग्जसाठी उत्तम वर्कआउट आहे. आपण जेवढा एक्सरसाइज करता तेवढीच आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमताही वाढते.
४. प्रदूषणापासून दूर राहा – सेकंड हँड स्मोक टाळा. ट्रॅव्हल त्या वेळी करा ज्यावेळी रस्त्यांवर गर्दी कमी असेल. जिथे धूळ धूर असेल तिथे एक्सरसाइज करू नका. आपले घर स्मोक फ्री ठेवा. सिंथेटिक एअर फ्रेशनर टाळा. नैसर्गिक हवा आत येऊ द्या.
५. बेली ब्रीदिंग करा-१. आपला एक हात छातीवर व दुसरा पोटावर ठेवा. २. दीर्घ श्वास घ्या. यामुळे पोट बाहेर आल्याचे जाणवेल. ३. हळू हळू श्वास सोडा.
आपल्या पोटावर हलकासा दाब ठेवा. ४. हा एक्सरसाइज जमेल तेवढा करा. श्वास घेण्याचे हे तंत्र आपली लंग्ज बळकट करील. वास्तविक, जेव्हा आपण बेली ब्रीरदिंग करतो तेव्हा