आरोग्य

डायबिटीसच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत ‘ही’ फळे! रक्तातील साखर राहील नियंत्रणात आणि शरीराला मिळतील आवश्यक पोषण मूल्य

Useful Fruit For Diabetics Patient:- सध्याची जीवनशैली जर बघितली तर अत्यंत धावपळीची आणि ताण-तणावाची असून त्यामुळे अनेक व्यक्तींचे स्वतःच्या आरोग्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे या सगळ्या जीवनशैलीचा विपरीत परिणाम हा आरोग्यावर होत असून यामुळे डायबिटीस तसेच हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.

त्यातल्या त्यात डायबिटीस म्हणजेच मधुमेह झालेल्या रुग्णांची संख्या देखील प्रचंड प्रमाणात वाढल्याचे सध्या चित्र आहे. डायबिटीसच्या दृष्टिकोनातून बघितले तर या रुग्णांना आहाराच्या बाबतीत खूप पथ्य पाळावे लागते. साधारणपणे आपल्याला माहित आहे की, कुठलाही गोड पदार्थ डायबिटीसच्या रुग्णांना वर्ज्य केलेला असतो किंवा ते खात नाहीत.

यामध्ये बऱ्याच फळांचा देखील समावेश होतो. परंतु असे काही फळे आहेत की त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स अर्थात जीआय खूप कमी असल्यामुळे अशी फळे खाणे डायबिटीसच्या रुग्णांना महत्त्वाचे ठरते.

अशा फळांमुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवता येते व शरीराला आवश्यक पोषक घटक देखील मिळतात. अशी नेमकी कोणती फळे आहेत की जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत? त्या फळांची माहिती थोडक्यात बघू.

डायबिटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात ही फळे

1- संत्रा- डायबिटीसच्या रुग्णांसाठी संत्रा फार फायदेशीर फळ असून त्याचा जीआय म्हणजेच ग्लायसेमिक इंडेक्स 40 च्या आसपास असतो व त्यामुळे हे फळ डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर समजले जाते. जीवनसत्व सी चा भरपूर स्त्रोत असलेले हे फळ शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

संत्र्यात असलेले फायबर्स साखरेच्या शोषणाची प्रक्रिया मंद करते आणि रक्तातील साखर नियंतणात ठेवण्याचे काम करते. संत्र्याचा रस न पिता ते जर तसेच खाल्ले तर फायबर्स जास्त प्रमाणात मिळतात.

2- किवी- डायबिटीच्या रुग्णांकरिता हे फळ देखील खूप महत्त्वाचे असून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 50 पर्यंत आहे. किवी या फळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते अँटिऑक्सिडंट असल्यामुळे साखर नियंत्रित राहण्यास मदत मिळते

व त्यामध्ये असलेले पोटॅशियम व सी जीवनसत्व हृदयाच्या आरोग्या करिता देखील फायदेशीर ठरते. किवी खाल्ल्यामुळे रक्ताचे साखरेचे प्रमाण अचानक न वाढता हळूहळू वाढते व ज्यामुळे साखरेचे प्रमाण स्थिर राहते.

3- सफरचंद- सफरचंदाला लो जीआय म्हणजेच कमी ग्लासेमिक इंडेक्स असलेले फळ म्हणून ओळखले जाते व त्याचा जीआय 36 ते 40 च्या दरम्यान आहे. फायबर्स आणि अँटिऑक्सिडंटचा भरपूर स्त्रोत असलेले हे फळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवण्यास खूप मोठी मदत करते.

फळांमध्ये नैसर्गिक साखर असते परंतु ती हळूहळू शोषली जाते व ज्यामुळे साखरेची पातळी स्थिर राहते. असे म्हटले जाते की डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी दररोज एक सफरचंद खाल्ले तर पोषणमूल्य आणि ऊर्जा मिळण्यास त्याची मदत होते व साखर देखील नियंत्रणात राहते.

4- पेरू- पेरूचा ग्लासमिक इंडेक्स 20 ते 24 च्या आसपास असून यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. पेरूमध्ये सी जीवनसत्व देखील मोठ्या प्रमाणावर असते व त्यामुळे शरीरातील नुकसानदायी घटक कमी करण्याचे काम पार पाडते. पेरू सालीसह खाल्ल्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा शरीराला होतो.

5- पपई- पपईचा ग्लायसेमीक इंडेक्स आठ पर्यंत असतो व त्यामुळे हे देखील सुरक्षित फळ मानले जाते. पपईमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असल्याने साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.तसेच पपईचा उपयोग पचन क्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराला नॅचरली ऊर्जा मिळण्यासाठी देखील होतो. त्यामुळे पपई खाणे डायबेटीसच्या पेशंट करिता एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.

(टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहिती म्हणून सादर केली आहे. आहारात बदल किंवा आरोग्य संबंधित कुठलाही निर्णय घेण्याअगोदर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts