आरोग्य

उन्हाळ्यामध्ये अंगाला येणाऱ्या घामाने त्रस्त आहात का? वापरा ‘या’ छोट्या टिप्स आणि उष्णता व घामापासून मिळवा मुक्तता

सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात तापमानात वाढ झालेली आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या कालावधीत थोडे जरी उन्हात बाहेर पडला तरी अंगाला प्रचंड प्रमाणात घाम येतो व अक्षरशः कपडे ओले होतात.

त्यामुळे  उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामामुळे व्यक्ती त्रस्त होतो. अंगाला येणारा जास्त घाम हा त्वचेच्या आरोग्यासाठी वाईट आहेस परंतु त्याची येणारे दुर्गंधी देखील त्रासदायक ठरते. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण या घामापासून किंवा उष्णतेपासून वाचण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करतात.

परंतु काही केल्या अंगाला येणारा घाम आणि त्यामुळे होणारा त्रास मात्र कमी होताना दिसून येत नाही. या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणात तहान देखील लागते.

त्यामुळे उन्हाच्या कालावधीमध्ये शरीर स्वच्छ ठेवणे व जास्त घामामुळे त्वचेचे काही रोग उद्भवणार नाहीत या दृष्टिकोनातून काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

उन्हाळ्यामध्ये अंगाला येणाऱ्या घामाने त्रस्त आहात का? वापरा ‘या’ छोट्या टिप्स आणि उष्णता व घामापासून मिळवा मुक्तता

त्यामुळे या लेखात आपण काही साध्या व सोप्या टिप्स बघणार आहोत ज्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत अंगाला येणाऱ्या घामापासून काही प्रमाणात सुटका मिळू शकते.

 या छोट्या टिप्स वापरा आणि घामापासून मुक्तता मिळवा

1- नियमितपणे आंघोळ करणे उन्हाळ्यामध्ये दोनदा अंघोळ करणे खूप गरजेचे आहे. उन्हाळ्यात त्वचेच्या मूर्तपेशी, घाण तसेच घाम इत्यादी गोष्टींपासून त्वचेचे रक्षण करण्याकरिता आंघोळ करणे खूप गरजेचे आहे. जर उन्हाळ्यामध्ये दोनदा अंघोळ केली तर शरीर स्वच्छ राहण्यास मदत होते.

2- सैल कपडे घालावेत उन्हाळ्यामध्ये अंगाला घट्ट बसतील असे कपडे परिधान न करता सैल कपडे घालावेत. त्यामुळे शरीरातून हवा जाण्यासाठी जागा राहते व उष्णतेपासून बचाव होतो. तसेच उष्णतेपासून वाचण्यासाठी तुम्ही हलक्या रंगाच्या कपड्यांचा वापर करू शकतात.

3- नियमितपणे व्यायामाची गरज नियमितपणे व्यायाम केल्याने शरीराची दुर्गंधी कमी व्हायला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते. तसेच तुम्ही वर्कआउट केल्यानंतर फ्रेश होण्याकरिता व शरीरावर आलेला घाम निघून जावा याकरिता थंड पाण्याने आंघोळ करणे गरजेचे आहे.

4- हायड्रेटेड रहा उन्हाळ्यामध्ये नियमितपणे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कारण घामावाटे शरीरातील जे काही पाणी निघून जाते त्याची  कमतरता भरून काढण्याकरिता मदत होते. उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिल्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. तसेच घाम देखील कमी प्रमाणामध्ये येतो.

5- फेस मिस्टचा उपयोग करा फेस मिस्ट चेहऱ्यावर शिंपडले तर उन्हाळ्यामध्ये त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते व तुम्हाला पोषण देखील मिळते. यामुळे जास्त घाम येणे तसेच मुरूम व घामामुळे इतर त्वचेच्या समस्या टाळण्यासाठी देखील मोठी मदत होते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts