आरोग्य

मोबाईल फोनमधून निघणारा ‘हा’ प्रकाश डोळ्यांसाठी ठरू शकतो घातक ; धोक्यापासून वाचण्यासाठी काय कराल ? तज्ञांनी सांगितले हे उपाय…

१ जानेवारी २०२५ : मोबाईल फोन दीर्घकाळ वापरल्याने मायोपियाचा धोका वाढतो.अशा परिस्थितीत, नेत्रतज्ज्ञ मोबाईल फोन मर्यादित आणि वाजवी अंतरावर वापरण्याचा सल्ला देतात.आता प्रश्न असा पडतो की, सतत मोबाईलचा वापर डोळ्यांसाठी धोकादायक कसा ? आणि मोबाईल वापरताना डोळ्यांपासून किती अंतरावर ठेवायचा ? याविषयी येथे सविस्तर माहिती देत आहोत.

आजकाल जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो.अनेक वेळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण गरजेपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरायला लागतात.अशा स्थितीत त्याचा परिणाम डोळ्यांवरही होतो.फोन वापरताना तो डोळ्यांपासून कमीत कमी किती अंतरावर असावा,याबद्दल अनेकांना माहिती नसते.नेत्रतज्ञ आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, कन्नौजचे विभागप्रमुख डॉ. आलोक रंजन यांनी मोबाईल फोनच्या सतत वापरामुळे होणाऱ्या तोट्यांबद्दल माहिती दिली आहे.

फोनचे डोळ्यांपासूनचे अंतर

तज्ज्ञांच्या मते, हे समोर आले आहे की बहुतेक युजर्स त्यांचे स्मार्टफोन डोळ्यांपासून सुमारे ८ इंच अंतरावर ठेवतात, जे डोळ्यांसाठी हानीकारक आहे.तुम्ही तुमचा मोबाईल फोन जितका जवळ ठेवाल तितका तो तुमच्या डोळ्यांना जास्त हानी पोहोचवेल.अशा परिस्थितीत मोबाईल फोन चेहऱ्यापासून किमान १२ इंच किंवा ३० सेंटीमीटर अंतरावर ठेवावा.

वेळोवेळी डोळे मिचकावणे

स्मार्टफोनचा सतत वापर करत असताना,वेळोवेळी डोळे मिचकावणे महत्त्वाचे आहे.वेळोवेळी पापण्या उघडझाप केल्याने डोळे ओले राहतील,ज्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि जळजळ टाळता येईल.याशिवाय डोळे उघडझाप केल्याने तुमच्या डोळ्यांना पुन्हा फोकस करण्यात मदत होईल.१५ मिनिटांत १०-१२ वेळा पापण्या उघडझाप करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

मोबाईल फोनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी आणि रेटिनासाठी धोकादायक

डॉ.आलोक रंजन यांच्या मते सतत मोबाईलचा वापर डोळ्यांसाठी हानीकारक आहे.या धोक्यांची जाणीव असूनही, बरेच लोक त्यांच्या मोबाईल फोनवर जास्त वेळ घालवतात. युजर्स त्यांच्या स्मार्टफोनवर गेमिंगपासून ते मूव्ही स्ट्रीमिंगपर्यंत विविध अॅक्टिव्हिटीजमध्ये गुंततात आणि या प्रक्रियेत अनेकदा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.मोबाईल फोनमधून निघणारा प्रकाश डोळ्यांसाठी आणि रेटिनासाठी धोकादायक ठरू शकतो,कारण तो कॉर्निया आणि लेन्सद्वारे फिल्टर केला जात नाही.या स्थितीत थकवा, डोळ्यांमध्ये कोरडेपणा आणि खाज सुटणे, अंधुक दृष्टी आणि डोकेदुखी यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

अशी घ्या डोळ्यांची काळजी

फक्त फोनमुळेच नाही तर ऊन, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे आपल्या डोळ्यांना अपाय होऊ शकतो.आपल्या डोळ्यांची कशी काळजी घ्यावी यासाठी याठिकाणी काही टिप्स देत आहोत.वर्षभर सनग्लासेस घाला.धूम्रपान करू नका.पौष्टिक आहार घ्या.दृष्टीवर ताण आणू नका.कॉम्प्युटरवर काम करताना अधूनमधून ब्रेक घ्या.डोळे चोळणे बंद करा.तुमचा चष्मा आणि कॉण्टॅक्ट लेन्स चांगल्या स्थितीत ठेवा.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni

Recent Posts