आरोग्य

घरच्या घरी टूथपेस्ट बनवा आणि पिवळे दात चमकवा मोत्यासारखे! वाचा टूथपेस्ट बनवण्याची पद्धत

बऱ्याच जणांना धूम्रपान, तंबाखू आणि गुटखा खाण्याची सवय असते. त्यामुळे बऱ्याचदा दाते हे पिवळ दिसायला लागतात किंवा त्यावर काळपट पद्धतीचा रंग दिसून येतो. तसेच आपल्या तोंडाची स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष न पुरवल्यामुळे देखील दातांवर पिवळा प्लॅक म्हणजेच पिवळा थर जमायला लागतो व त्याचा विपरीत परिणाम हा दातांवर व हिरड्यांवर सुद्धा होऊ शकतो. तसेच अशा पिवळ्या दातांमुळे किंवा दातांवरील पिवळ्या थरामुळे पायोरिया तसेच तोंडातून रक्त येणे, संसर्ग होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे तोंडाची स्वच्छता व दातांची स्वच्छता हा एक खूप महत्वपूर्ण भाग आहे. साधारणपणे प्रत्येक जण सकाळी ब्रश करताना टूथपेस्ट चा वापर करतात. परंतु असे दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट खरंच फायद्याचा आहे का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. बाजारामध्ये ज्या काही टूथपेस्ट आणि दूध पावडर उपलब्ध असते

यामध्ये कारबामाईड पेरॉक्साईडचा वापर केलेला असतो. यामध्ये काही हायड्रोजन ऑक्साईड मध्ये देखील मोडले जातात. जे ब्लिचिंग एजंट असून ब्लिचिंग हे सुरक्षित मानले जाते. परंतु बाजारात मिळणाऱ्या टूथपेस्ट अथवा टूथ पावडर ऐवजी जर तुम्ही घरी काही पदार्थांचा वापर करून जर टूथपेस्ट किंवा दूध पावडर बनवली तर नक्कीच यामुळे दात पांढरे शुभ्र होण्याला खूप मोठी मदत होऊ शकते.

 घरच्या घरी दूध पावडर किंवा टूथपेस्ट बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

घरच्या घरी टूथपेस्ट अथवा टूथ पावडर बनवण्याकरिता तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साइड आणि बेकिंग सोडा या गोष्टी विकत घ्याव्या लागतील. या दोन्ही वस्तूंचा वापर करून तयार झालेल्या टूथपेस्टच्या वापरामुळे दात चमकतात. यामध्ये आपण बेकिंग सोड्याचा गुणधर्म पाहिला तर तो पाण्यासोबत मिसळला तर या माध्यमातून फ्री रॅडिकल सोडले जातात व यामुळे दातांच्या इनेमलवर पडणारे डाग नष्ट होतात.

 अशा पद्धतीने बनवा घरच्याघरी टूथपेस्ट

या पदार्थांचा वापर करून टूथपेस्ट बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड आणि एक चमचा बेकिंग सोडा एकत्र मिसळून घ्यावा. हे दोन्ही घटक चांगले मिक्स करून याची पेस्ट बनवावी आणि ब्रश करायला सुरुवात करावी. साधारणपणे एक मिनिटभर ही पेस्ट दातांवर राहू द्यावी व नंतर तोंड व्यवस्थितपणे स्वच्छ धुऊन घ्यावे. यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडच्या तुलनेत बेकिंग सोड्याचा वापर कमी करावा. तसेच तयार पेस्ट ही स्मूथ असावी व ती जाडी भरडी किंवा करकरीत नसावी.

 या गोष्टींची काळजी घेणे आहे गरजेचे

अशा पद्धतीने बनवलेला घरगुती टूथपेस्टचा वापर तुम्ही ब्रश करण्यासाठी केल्यानंतर तोंड व्यवस्थित स्वच्छ धुऊन घ्यावे.कारण तोंडामध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा बेकिंग सोडा शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी. महत्वाची काळजी म्हणजे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा या पेस्टचा वापर करावा. बेकिंग सोड्याचा जर जास्त प्रमाणात वापर केला तर त्याचे विपरीत परिणाम देखील होण्याची शक्यता असते. याच्या जास्त वापराने दातांच्या इनॅमलवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts