अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात अनेकदा लोकांना अक्रोड खाणे आवडते. पण अनेकांना माहीत नाही की अक्रोड चेहऱ्यासाठी जेवढे फायदेशीर आहे तेवढेच मेंदूसाठीही फायदेशीर आहे. अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने सांधेदुखीही नियंत्रणात राहते, त्वचेच्या अनेक समस्याही अक्रोडामुळे दूर होतात.(Winter Health Tips)
अक्रोडमध्ये प्रथिने, चरबी, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. एवढेच नाही तर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, तांबे, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक देखील यामध्ये आढळतात, त्वचेच्या कोणत्याही समस्येवर अक्रोड खूप गुणकारी आहे. जाणून घ्या अक्रोडाचे काही न ऐकलेले फायदे.
फेस पॅक बनवा :- एक चमचा अक्रोड पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, दोन चमचे गुलाबजल आणि अर्धा चमचा मध मिक्स करून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा. तुम्ही 1 आठवड्यात 2 ते 3 वेळा वापरू शकता.
डोळ्या खालील काळी वर्तुळे घालविण्यासाठी प्रभावी :- अक्रोड तेल तुमच्या डोळ्यांखालील सूज दूर करते आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करते. थोडे अक्रोड तेल घ्या. तेल कोमट करून डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तिथे लावा. त्यानंतर सकाळी चेहरा धुवा. ही प्रक्रिया तुम्ही रोज रात्री करू शकता.