Weight Loss Tips : तुमचेही वजन वाढत असेल तर तुम्हीही तुमच्या वाढत्या वजनाला पूर्णविराम देऊ शकता. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि या दिवसांमध्ये फळांचा राजा आंबा हा सर्वाधिक खाल्ला जातो. तसेच आंबा हा अनेकांचे आवडते फळ आहे.
आंबा हा चवीला गोड आणि आंबट असतो. आंबा हा आरोग्यासाठी पोषक मानला जातो. त्यामुळे आंबा खाणे हे फायदेशीरच मानले जाते. तुम्हालाही तुमचे वाढते वजन कमी करायचे असेल तर आंबा हा रामबाण उपाय ठरू शकतो.
अनेक लोकांचा असा गैरसमज झाला आहे की आंबा खाल्ल्याने वजन वाढते. मात्र हे चुकीचे आहे. कारण आंबा खाल्ल्याने वजन कमी होते असे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
पण जर वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला आंबा योग्य पद्धतीने खाल्ला पाहिजे. अन्यथा तुम्ही चुकीच्या पद्धतीने आंबा खाल्ला तर तुमचे वजन कमी होणार नाही. आंब्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. हीच पोषक तत्वे वजन कमी करण्यास मदत करतात.
चिरलेल्या आंब्यामध्ये 99 कॅलरीज, 1.4 ग्रॅम प्रथिने, 25 ग्रॅम कार्ब, 22.5 ग्रॅम साखर, 2.6 ग्रॅम फायबर, 67% व्हिटॅमिन सी, 18% फोलेट, 10% व्हिटॅमिन ए आणि 10% व्हिटॅमिन ई असते. याशिवाय यामध्ये कॅल्शियम, झिंक, लोह आणि मॅग्नेशियम काही प्रमाणात असते.
वजन कमी करण्यासाठी आंब्याचे सेवन करण्याच्या योग्य पद्धती
आंबा स्नॅक्स म्हणून खा
जर तुम्हाला आंबा आवडत असेल तर त्याचे सेवन प्रमाणात केले पाहिजे. अन्यथा तुम्ही प्रमाणाबाहेर आंब्याचे सेवन केले तर तुमचे वजन वाढेल. वजन कमी करण्यासाठी आंबा स्नॅक्स म्हणून खा. आंबा हे एक एनर्जी बुस्टर फळ आहे. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे आंबा तुमचे वजन कमी करण्यास मदत करेल.
सामान्य पद्धतीने आंबा खा
तुम्हाला जर आंबा खाऊन वजन कमी करायचे असेल तर तो योग्य पद्धतीने खाल्ला पाहिजे. आंबा हा सामान्य पद्धतीने खाल्ला पाहिजे. जर तुम्ही आंब्याचा रस किंवा मँगो शेक बनवून खाल्ला तर तुमचे वजन कमी होणार नाही. असे केल्याने आंब्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.
आंबा खाल्यानंतर दुसरे पदार्थ खाऊ नका
आंबा खाऊन वजन कमी करायचे असेल तर आंब्याचे सेवन केल्यानंतर त्यावर कोणताही पदार्थ खाऊ नका. जर तुम्ही आंब्याचे सेवन केल्यांनतर इतर पदार्थांचे सेवन केले तर तुमच्या शरीरात जास्त कॅलरी निर्माण होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी आंब्याचे दुपारी सेवन करावे.
मर्यादित प्रमाणात करा आंब्याचे सेवन
वजन कमी करायचे असेल तर आंब्याचे सेवन प्रमाणत केले पाहिजे. जर तुम्ही अधिक प्रमाणात आंब्याचे सेवन केले तर तुमचे वजन वाढू शकते. जास्त आंब्याचे सेवन तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते.