आरोग्य

Weight Loss Tips: घरातील ‘या’ पदार्थाचा वापर करा आणि वजन घटवा! वाचा महत्त्वाची ए टू झेड माहिती

Weight Loss Tips:- सध्याच्या धावपळीच्या कालावधीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण झालेले आहेत. संतुलित आहाराऐवजी बाहेरच्या जंक फूड्स किंवा तळलेले पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे आणि ताण-तणावाची जीवनशैली यामुळे हृदयरोग तसेच हाय ब्लडप्रेशर, डायबिटीस इत्यादी व्याधी अनेक जणांना जडलेले आपल्याला दिसून येतात.

तसेच आरोग्यविषयक या समस्यांबरोबरच वाढते वजन ही देखील एक खूप मोठी समस्या असून वाढत्या वजनामुळे देखील अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपण बरेच जण पाहतो की वजन घटवण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाय योजना करताना आपल्याला दिसून येतात. यासाठी व्यायाम तर केला जातो किंवा डाएट किंवा इतर अनेक उपाय योजना अवलंबल्या जातात.

यामध्ये बऱ्याचदा वजन कमी होते. परंतु कालांतराने परत वजन वाढायला सुरुवात होते. वजन वाढण्याच्या समस्येपासून जर मुक्तता मिळवायचे असेल तर यामध्ये काही घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरतात. त्यातीलच एक फायदेशीर उपाय म्हणजे मेथीचे दाणे हा होय.

साधारणपणे प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये मेथी आपल्याला आढळून येते. मेथीच्या दाण्यांचे किंवा मेथीचे आरोग्य विषयक फायदे देखील तितकेच असून मधुमेही रुग्णांसाठी मेथीचे दाणे खूप फायदेशीर आहेत. मूर्ती छोटी परंतु कीर्ती मोठी असे जरी मेथीच्या दाण्यांचे वर्णन केले तरी वावगे ठरणार नाही. याच मेथीच्या दाण्यांचा वापर वजन कमी करण्यासाठी देखील केला जातो.

 वजन घटवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर कसा करावा?

1- मेथीचा चहा आता आपल्याला दूध साखरेचा चहा माहिती आहे. या व्यतिरिक्त तुम्ही मेथीचा चहा देखील पिऊ शकता. मेथीचा चहा तुम्हाला तयार करायचा असेल तर त्याकरिता एका पॅनमध्ये एक चमचाभर मेथीचे दाणे घ्यावेत व त्यामध्ये दालचिनीचा तुकडा घालावा त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकावे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा व चहाच्या गाळणीने गाळून सकाळी रिकाम्या पोटी हा चहा घ्यावा.

2-

मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांचे फायदे आहारामध्ये जर तुम्ही मोड आलेल्या मेथीदाण्यांचा समावेश केला तरी याचा खूप मोठा फायदा होतो. याकरिता तुम्हाला रात्रभर पाण्यामध्ये मेथीचे दाणे भिजत घालून ठेवावे लागतील व सकाळी सॅलेड मध्ये मेथीचे हे मोड आलेले दाणे मिक्स करावे व नंतर खावे.

3- मेथी आणि मध यांचा वापर मेथी सोबतच मध देखील वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. मधामध्ये जे काही गुणधर्म आहेत ते वजन घटवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करतात. याकरिता तुम्हाला मेथीच्या दाण्याची पावडर तयार करावी लागेल व त्यामध्ये मध मिसळून ते दररोज खावे. त्यानंतर कोमट पाणी प्यावे. या उपायामुळे शरीरावरील जी काही जास्तीची चरबी असते ती कमी व्हायला मदत होते.

 मेथीच्या दाण्यांचे इतर फायदे

मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर, लोह, विटामिन ए आणि डी यासारखे जीवनसत्वे असतात. एवढेच नाही तर यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळून येतात व यामुळे मेटाबॉलिझम बुस्ट होते. त्यामुळे तुम्ही जे काही अन्न खातात ते व्यवस्थितरित्या पचायला मदत होते व वजन कमी करण्यास यामुळे खूप हातभार लागतो. एवढेच नाही तर मेथीच्या दाण्यांमध्ये असलेल्या काही गुणधर्मामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts