आरोग्य

Health Tips In Summer: उन्हात फिरून घरी परत आला तर चुकून काही वेळ ‘या’ गोष्टी करू नका! नाहीतर पडाल आजारी

Health Tips In Summer:- उन्हाळा हा कालावधी दोन्ही ऋतूंपेक्षा खूप त्रासदायक असतो. गेल्या काही वर्षापासून तर दिवसेंदिवस तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्यामुळे अनेक प्रकारचे शारीरिक व्याधी या कालावधीत होण्याची शक्यता वाढते. आपल्याला माहित आहेस की सध्या संपूर्ण राज्यामध्ये सरासरी कमाल तापमान 40° च्या पुढे असल्याने घराबाहेर पडणे देखील अवघड झाल्याची स्थिती आहे.

परंतु बऱ्याचदा आपल्याला काही अत्यावश्यक कामांमुळे घराच्या बाहेर जावेच लागते व अशावेळी प्रचंड असलेल्या या उन्हात स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे असते. कारण आरोग्य विषयक अनेक समस्या या कालावधीत उद्भवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घेऊन दैनंदिन रुटीन ठेवणे महत्त्वाचे ठरते.

बऱ्याचदा आपण कामानिमित्त घराबाहेर असतो व घरी आल्यानंतर नकळतपणे काही चुका करतो. या चुकाच आपली तब्येत बिघडण्याला कारणीभूत ठरू शकतात.त्यामुळे तुम्ही जर उन्हातून घरी आलात तर काही गोष्टी काही कालावधी करिता टाळणे खूप गरजेचे असते.

 उन्हातून घरी परत आल्यानंतर काही कालावधी करिता या गोष्टी टाळा

1- उन्हातून घरी आल्यानंतर थंड पदार्थांचे सेवन टाळा बऱ्याच जणांना सवय असते की उन्हातून घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी, फ्रिज मधील काही खाद्यपदार्थ किंवा आईस्क्रीम खातात. परंतु उन्हातून आल्यावर लगेच या गोष्टी करण्याची चूक मुळीच करू नये. कारण बाहेरून आल्यानंतर उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढलेले असते व अशा परिस्थितीत थंड पदार्थ खाल्ले तर शरीराच्या तापमानामध्ये अचानकपणे बदल घडतात व त्यामुळे आरोग्याला फटका बसतो.

2- थंड पाण्याने अंघोळ करणे उन्हातून घरी आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करण्याची बऱ्याच जणांना सवय असते. कारण असे केल्यामुळे शरीराला थंडावा येतो व ताजेपणा वाटतो. परंतु उन्हातून घरी आल्यानंतर लगेच आंघोळ केली तर आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम पडू शकतो. याकरिता बाहेरून घरी आल्यानंतर शरीर सामान्य तापमानावर येईल तोपर्यंत आंघोळ करू नये. म्हणजे शरीर सामान्य तापमानावर येईल तेव्हा आंघोळ करावी.

3- एसी किंवा कुलरच्या समोर बसणे उन्हातून घरी आल्यानंतर बरेच जण एसी किंवा कुलरच्या थंड हवे समोर आरामशीर बसतात. परंतु आधीच शरीराचे तापमान वाढल्यामुळे एसी किंवा कुलर समोर बसण्यावर तापमानात अचानक बदल होतो. त्यामुळे सर्दी व खोकला तसेच ऍलर्जी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर शरीर सामान्य होईल त्या कालावधीपर्यंत पंख्याखाली बसून राहणे गरजेचे आहे.

4- जड अन्नपदार्थांचे सेवन उन्हाळ्यामध्ये तळलेले पदार्थ आणि जड अन्नपदार्थ म्हणजे जे पचायला कठीण असतात असे अन्नपदार्थ खाऊ नये. प्रामुख्याने जेव्हा तुम्ही उन्हातून फिरून घरी येतात तेव्हा असे पदार्थ मुळीच खाऊ नये. याउलट जर तुम्ही हलका आणि पौष्टिक आहार घेतला तर फायदा होतो व यामध्ये फळे, भाजीपाला आणि दही याचा समावेश करावा. यामुळे तुम्हाला पोट भरल्याचे समाधान मिळेल आणि पचनक्रिया देखील चांगली राहील.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts