Health News : पुरुषांच्या तुलनेमध्ये मद्यपान करणाऱ्या स्त्रियांचा मृत्यूदर हा जास्त आहे. विशेष म्हणजे ज्या स्त्रियांचे वय ६५ पेक्षा अधिक आहे, अशा स्त्रियांमध्ये मद्यपान करण्याचे ‘फॅड’ जास्त आहे.
त्यामुळे याचे व्यसन होऊन आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात आणि हेच मृत्यू वाढण्याचे एकमेव कारण ठरत आहे.
१९९९ ते २०२० दरम्यान अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार मद्यप्राशनाशी संबंधित ६ लाखांहून अधिक मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले आहे. कोरोना कालावधीमध्ये महिलांमध्ये दारू पिण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचेही या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आले आहे कोरोना महामारी कालावधीत दिल्लीमध्ये ‘कम्युनिटी अगेन्स्ट ड्रंक अॅण्ड ड्रायव्हिंग’ या संस्थेने एक सर्वेक्षण केले होते. यामध्ये ३७ टक्क्यांहून अधिक महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले.
पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान प्रमाणात मद्यपान करतात, तरी महिलांना ती अधिक प्रमाणात चढते, अशी माहिती समोर आली आहे. मद्यपान करण्याची करणे ज्याप्रमाणे वेगवेगळी असू शकतात, तसेच मद्यपानामुळे दोघांच्या शरीरावर होणारे परिणामदेखील भिन्न आहेत.
पुरावे असे सूचित करतात की, जवळजवळ २० टक्के प्रौढ पुरुषांना मद्यपानाशी संबंधित अडचणी उद्भवू शकतात, तर दुसरीकडे केवळ सहा टक्के प्रौढ स्त्रिया मद्यपी असून, त्या नियमितपणे मद्य सेवन करतात.
तरीही पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आरोग्यावर मद्यपानाचा परिणाम अधिक दिसून येतो. स्त्रियांना पुढील आयुष्यात मद्यपानामुळे अल्कोहोल संबंधित आरोग्याच्या समस्या उध्दभवयाचा धोका जास्त असतो संशाधनमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, स्त्रिया “अल्कोहोल डिहायड्रोजनेज’ नावाचे एन्झाइम कमी प्रमाणात तयार करतात, जे यकृतामध्ये तयार होते आणि शरीरातील अल्कोहोल ब्रेक करतात,
तसेच अल्कोहोल चरबीद्वारे शोषले जाते आणि पाण्यामुळे पसरले जाते. नैसर्गिकरीत्या शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असल्याने आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने स्त्रियांच्या शरीरात दारूला अधिक तीव्र शारीरिक प्रतिसाद मिळतो. त्यामुळे पुरुषांइतके मद्यपान केले तरीही स्त्रियांच्या रक्तातील अल्कोहोल उच्च पातळी गाठते.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याचा परिणाम स्त्रियांमध्ये वेगाने दिसून येतो. उदाहरणार्थ, एक पुरुष २० ते ३० वर्षापर्यंत जास्त मद्यपान करणारा असेल, तर त्याला मध्यम स्वरूपाच्या अडचणी येऊ शकतात; परंतु स्त्रीने केवळ पाच वर्षांपर्यंत जास्त मद्यपान केले तरी तिला जास्त समस्या उद्भवू शकतात. यात गर्भाशयामध्ये सिफिलिस, बेस्ट कॅन्सर, हृदयरोगाचा झटका, यकृताचे आजार, एचआयव्ही संसर्ग, हिपॅटायटिस बी किंवा सी यासारखे असाध्य रोग जडतात,