Conjunctivitis : सध्या जिल्ह्यासह राज्यात सगळीकडे डोळे येण्याची साथ आलेली आहे. मोठ्या संख्येने रूग्ण या आजाराने ग्रासले असून, ते उपचार घेत आहेत. हा आजार संसर्गजन्य असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.
या आजाराने ग्रस्त रुग्णांनी कोणतेही घरगुती उपचार न घेता नजीकच्या नेत्रतज्ञांशी संपर्क साधून योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन अहमदनगर जिल्हा नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिलीप फाळके यांनी केले आहे.
आपल्या डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर एक पारदर्शक पापुद्रा असतो. त्याला ज्यावेळी इफेक्शन होते, यालाच आपण डोळे येणे असे म्हणतो. हे इंफेक्शन व्हायरलमुळे होते. शक्यतो पावसाळ्यात हा आजार बळावतो.
याविषयी रूग्णांत बरेच समज-गैरसमज आहेत. या आजारात नेत्रतज्ञाकडे न जाता बरेच रूग्ण घरगुती उपचार घेतात. काही रूग्ण त्यांच्याकडे घरी असणाऱ्या ड्रॉप्सचा वापर करतात. या ड्रॉप्समध्ये असणाऱ्या स्टेरॉईडमुळे बरेच साईड इफेक्टस अशा रूग्णांत पाहायला मिळतात.
या आजाराची लक्षणे म्हणजे सुरूवातीला डोळे चुरचुरणे, खुपणे, डोळ्यांचा पांढरा भाग हळूहळू लाल होतो, डोळ्यातून पाणी येते, डोळे दुखतात. हा आजार दोन्ही डोळ्यांनाही होऊ शकतो, पापण्याही सुजतात, डोळ्यातून चिकट घाण येते, काही रुग्णांना डोकेदुखी, ताप येतो अशावेळी नेज्ञतज्ञांकडे जावे.
ते आपल्याला तपासून काही ड्रॉप्स व औषधे देतील, तो डोस पूर्ण केल्यास हा आजार आठवड्यात पूर्णपणे बरा होतो. हा आजार एकाला झाल्यास त्याच्यापासून दुसऱ्याला होण्याची शक्यता असते. आपल्यापासून दुसऱ्याला हा आजार होऊ नये, यासाठी या आजाराची काळजी घ्यावी, असे डॉ. फाळके म्हणा