Health News : ग्लोबल वार्मिंगमुळे आर्क्टिक आणि इतर बर्फाच्छादित प्रदेशातील बर्फाचे ढिगारेही वितळत असून या बर्फाच्या वितळणाऱ्या ढिगाऱ्याखाली दडपले गेलेले विनाशकारी विषाणू बाहेर पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
या वितळणाऱ्या आर्क्टिकमधून पर्माफ्रॉस्ट झोम्बी व्हायरस बाहेर पडू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात आली असून तो कोरोनापेक्षाही घातक असल्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.
शास्त्रज्ञांनी स्लीपिंग व्हायरसच्या धोक्यांबाबत इशारा दिला आहे. आर्टिक आणि इतरत्र बर्फाच्या ढिगाऱ्याखाली विनाशकारी विषाणू दबले जातात. वितळणारा आर्क्टिक पर्माफ्रॉस्ट अशाच प्रकारचा झोम्बी व्हायरस वातावरणात सोडू शकतो, त्यामुळे कोरोना काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
या विषाणूचे धोके अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एका शास्त्रज्ञाने गेल्या वर्षी सायबेरियन पर्माफ्रॉस्टमधून घेतलेल्या नमुन्यांमधून काही विषाणूंचे पुनरुज्जीवन केले.
हे विषाणू हजारो वर्षे जमिनीत गोठून होते. एक्स-मार्सिले विद्यापीठातील अनुवांशिक शास्त्रज्ञ जीन-मिशेल क्लेव्हरी म्हणाले, सध्या साथीच्या जोखमींचे विश्लेषण दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये उद्भवू शकणाऱ्या आणि नंतर उत्तरेकडे पसरलेल्या रोगांवर केंद्रित आहे.
उत्तरेमध्ये उद्भवलेल्या आणि दक्षिणेकडे पसरलेल्या रोगांवर लक्ष केंद्रित केले जात नाही; पण हे चूक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पर्माफ्रॉस्टमध्ये कोणते विषाणू आहेत हे अद्याप शास्त्रज्ञांना माहिती नाही.
परंतु एखादा व्हायरस सक्रिय होण्याचा धोका शास्त्रज्ञ व्यक्त करत असून त्यामुळे कोरोनाप्रमाणे महाभयंकर महामारी येण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यात पोलिओचा प्राचीन प्रकारही असू शकतो; जो हजारो वर्षे पर्माफ्रॉस्टमध्ये दबलेला असून तो एकल-कोशिक जीवांना संक्रमित करू शकतो, २०१४ मध्ये सायबेरियातील क्लेव्हरी यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने हे दाखवून दिले आहे.