Aditya Mangal Rajyog:- अजून सहा दिवसांनी नवीन वर्ष सुरू होत असून या नवीन वर्षामध्ये अनेक ग्रह व नक्षत्रांमध्ये देखील बदल होणार आहेत. तसेच काही ग्रहांचे राशी किंवा नक्षत्रामध्ये परिवर्तन झाल्यामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग देखील निर्माण होत आहेत. जसे नवीन वर्षात आपण काही नवीन गोष्टी करण्याचा संकल्प करतो व जीवनामध्ये काही वेगळे बदल करतो
अगदी त्याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले तर या ग्रहांच्या व नक्षत्रांच्या स्थित्यांतरामुळे देखील व्यक्तीच्या स्वभावापासून तर त्याच्या नातेसंबंध व आर्थिक परिस्थितीवर देखील सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. यामध्ये जर आपण काही तयार होत असणाऱ्या शुभ योगांचा विचार केला तर यामध्ये 2023 या वर्षाच्या शेवटी शेवटी आदित्य मंगल राजयोग तयार होत असून हा राजयोग काही राशींसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे.
म्हणजेच नवीन वर्षाचे चार महिने काही राशींच्या व्यक्तींना खूप फायद्याचे ठरणार आहेत. या कालावधीत या राशींच्या व्यक्तींना धनलाभासह प्रगतीच्या संधी देखील मिळणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर 28 डिसेंबरला सूर्य व मंगळ यांची युती होऊन आदित्य मंगल राजयोग तयार होणार आहे. या आदित्य मंगल राजयोगाचा परिणाम तीन राशींवर प्रामुख्याने दिसून येणार आहे. नेमक्या या तीन राशी कोणत्या व त्यांना कोणता लाभ होणार आहे? याबाबतची माहिती या लेखात घेऊ.
आदित्य मंगल राजयोगामुळे या राशींना होणार फायदा
1- धनु– हा राजयोग धनु राशीकरिता खूप चांगला ठरणारा असून धनु राशीतच हा राजयोग तयार होत असल्याने या राशींच्या व्यक्तींना येणाऱ्या 2024 च्या सुरुवातीला खूप मोठा फायदा होणार आहे. 2024 च्या सुरुवातीला या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी निर्माण होण्याची शक्यता असून ते आपल्या मधुर वाणीमुळे अनेक कामे मार्गी लावू शकणार आहेत.
करिअरच्या दृष्टिकोनातून देखील हे वर्ष धनु राशींच्या व्यक्तींकरिता फायद्याचे ठरणार आहे. जर या राशीच्या व्यक्तींनी वेळेमध्ये काही बदल स्वीकारले तर मोठ्या प्रमाणावर धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच धनु राशीच्या व्यक्तींचा या कालावधीत मानसन्मान वाढीस लागण्यास मदत होणार आहे.
2- मेष– आदित्य मंगल राजयोग तयार झाल्यामुळे येणारा कालावधी मेष राशींच्या व्यक्तींकरिता शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. मेष राशीच्या गोचर कुंडलीत हा राजयोग सातव्या स्थानी तयार होत असल्यामुळे येणाऱ्या कालावधीत करिअर किंवा कामाच्या ठिकाणी मेष राशीच्या व्यक्तींचा प्रभाव दिसून येऊ शकतो.
तसेच नोकरी बदलाचे देखील संकेत आहेत. तुम्हाला धार्मिक कार्यामध्ये देखील आवड निर्माण होण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये जर तुमचे काही अपूर्ण किंवा मोडकडीस झालेल्या योजना असतील तर त्यांची उभारणी तुम्हाला 2024 मध्ये करता येणार आहे. 2024 मध्ये मेष राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सुख लाभू शकते.
3- सिंह– या राशीच्या गोचर कुंडलीत पाचव्या स्थानी आदित्य मंगल राजयोग निर्माण होत असल्यामुळे सिंह राशींच्या व्यक्तींना येणाऱ्या काळात संतती सुखाची प्राप्ती मिळू शकते.
प्रेम संबंध असतील तर ते पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींचे लग्नाचे योग दिसून येत आहेत. काही जमिनीचे व्यवहार असतील तर ते मार्गी लागू शकतात. उद्योग व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर धनप्राप्ती मिळू शकते. काही अनपेक्षित व्यक्तींकडून तुम्हाला सुखाचा लाभ होऊ शकतो.
( टीप– वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही माध्यम म्हणून काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत.)