राशीभविष्य

मुलांकावरून ओळखता येते की एखाद्या व्यक्तीचे लव मॅरेज होणार की अरेंज मॅरेज? वाचा काय म्हणते याबाबत अंकशास्त्र?

Numerology Science:- ज्योतिष शास्त्राला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असे स्थान असून या आधारे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व तसेच त्याचे जीवन आणि भविष्य याबद्दल आपल्याला माहिती मिळत असते. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या आधारे व्यक्ति बद्दलची प्रत्येक गोष्ट कळायला मदत होते.

आपल्याला माहित आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या भविष्याविषयी किंवा येणाऱ्या पुढील आयुष्य विषयी काही माहिती हवी असेल तर तो ज्योतिषशास्त्राची मदत घेत असतो. यासोबतच ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्र देखील महत्त्वाचे असून यामध्ये व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो त्या आधारे त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो व त्या मुलांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या भविष्याविषयीचा अंदाज हा सांगितला जात असतो.

आपल्याला माहित आहे की, जन्मतारखेच्या अंकांच्या बेरजेवरून मुलांक काढला जातो. उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्या व्यक्तीचा जन्म जर कुठल्याही महिन्याच्या 21 तारखेला झाला असेल तर त्याचा मूलांक हा 2+1=3 असतो. या आधारे आपल्याला प्रत्येक व्यक्तीचा मुलांक काढता येतो.यानुसारच अंकशास्त्रानुसार आपण बघणार आहोत की कोणत्या मुलांकाच्या व्यक्तीचे लव मॅरेज होऊ शकते किंवा कोणत्या मुलांकाचे व्यक्तीचे अरेंज मॅरेज होऊ शकते? याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत.

कोणत्या मुलांकांच्या व्यक्तींचे होते लव मॅरेज अथवा अरेंज मॅरेज?

1- मुलांक 2- अंकशास्त्रानुसार बघितले तर ज्या व्यक्तींचा मुलांक दोन असतो त्या लोकांवर चंद्र ग्रहाचा विशेष प्रभाव असतो. हे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप विचारपूर्वक प्रेमावर विश्वास ठेवत असतात. परंतु एकदा जर त्यांनी प्रेमावर विश्वास ठेवला तर ते प्रेमविवाह करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच त्यांचा ट्रेंड हा लव मॅरेज कडे दिसून येतो.

2- मुलांक 3- अंकशास्त्रानुसार बघितले तर मुलांक तीन असलेले लोक गुरु ग्रहांशी संबंधित असतात या गुरु ग्रहाच्या प्रभावाने या मुलांकाच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व हे अतिशय शिस्तप्रिय असते व ते सहजपणे आयुष्यामध्ये जीवन जगत असतात. लग्नाच्या बाबतीत बघितले तर तीन मुलांक असलेले व्यक्ती लव्ह मॅरेज म्हणजेच प्रेमविवाह करण्याला प्राधान्य देतात.

3- मुलांक 4- मुलांक 4 ही राहूशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या लोकांमध्ये एकापेक्षा जास्त प्रेम संबंध दिसून येतात आणि ते प्रेमाबाबत फारसे गंभीर नसतात. त्यामुळेच हे व्यक्ती लव मॅरेज न करता अरेंज मॅरेज करण्याला प्राधान्य देतात.

4- मुलांक 5- अंकशास्त्रानुसार बघितले तर मुलांक पाच असलेले लोक बुध ग्रहाशी संबंधित आहेत. हे लोक पारंपरिक प्रथा आणि संबंधांवर जास्त प्रमाणात विश्वास ठेवतात. कुठल्याही गोष्टींमध्ये ते त्यांच्या कुटुंबाची संमती घेतात व नंतरच निर्णय घेत असतात व कुटुंबात देखील त्यांच्या निवडीवर विश्वास असतो. त्यामुळे लव मॅरेज पेक्षा हे व्यक्ती अरेंज मॅरेज करण्याला प्राधान्य देतात.

6- मुलांक 6- अंकशास्त्रानुसार बघितले तर या अंकावर शुक्र ग्रहाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. हे लोक प्रेमविवाहामध्ये मोठ्या प्रमाणावर यश मिळवतात. या मुलांकावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्याने लव लाईफमध्ये म्हणजेच प्रेम जीवनामध्ये देखील शुक्र ग्रहाचा खोलवर प्रभाव या व्यक्तींमध्ये दिसून येतो. त्यामुळे मुलांक सहा असलेले व्यक्ती प्रामुख्याने लव मॅरेज करतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts