Capricorn Yearly Horoscope 2024:- नवीन वर्षाचे सुरुवात ही प्रत्येक जण एखाद्या नवीन कामाची सुरुवात करून किंवा एखादा संकल्प करून करत असते. तसेच कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात देखील नवीन वर्षात करण्याचा बऱ्याच जणांचा प्रयत्न असतो. ज्याप्रकारे नवीन वर्षाचा परिणाम हा अनेक अंगानी आपल्या आयुष्यावर होतो तसाच तो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील होत असतो.
त्यामुळे नवीन वर्ष प्रत्येकाला कसे जाईल हे ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणून घेण्याची देखील प्रत्येकाची इच्छा असते. याच दृष्टिकोनातून आपण आज मकर राशीच्या व्यक्तींचे वर्ष 2024 मधील प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य बघणार आहोत. त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना कुठला महिना सुखद धक्का देणारा ठरेल आणि कुठल्या महिन्यामध्ये काही समस्या येऊ शकतील याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.
मकर राशीच्या व्यक्तींसाठी महिनानिहाय कसे राहील 2024 वर्ष?
1- जानेवारी 2024- मकर राशींच्या व्यक्तीच्या भाग्यामध्ये काही शुभ गोष्टी घडतील अशी शक्यता आहे. तसेच या महिन्यांमध्ये व्यवसाय आणि कामाच्या संदर्भामध्ये प्रवास करावा लागू शकतो. या महिन्यामध्ये जोडीदाराचा आदर करणे गरजेचे आहे. अचानक कुठून तरी पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात आमचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी या महिन्यात चांगले संबंध येऊ शकतात. पैशांच्या व्यवहारांमध्ये सावधगिरी ठेवावी.
2- फेब्रुवारी 2024- महिन्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकऱ्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. मला वेळ दिला तर नात्यांमध्ये आनंद निर्माण होईल. या महिन्यात मात्र कामात केलेला थोडासा निष्काळजीपणा देखील तुम्हाला महागात पडू शकतो.
या महिन्यात नोकरीची चांगली ऑफर तुम्हाला मिळू शकते. कोर्ट कचेरी मध्ये एखादे प्रकरण असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येईल. वैवाहिक जीवनामध्ये काही मतभेद येऊ शकतात. या महिन्यात तुम्हाला तुमच्या पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
3- मार्च 2024- विद्यार्थ्यांना या महिन्यांमध्ये चांगले यश मिळेल. कुटुंब आणि मुलांचे देखील सहकार्य मिळेल. या महिन्यात जोडीदारासोबत काही तणाव असू शकतो. व्यवसाय करिता हा महिना चांगला आहे.
या महिन्यांमध्ये कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे टाळा. याच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे. परंतु या महिन्यात निराशा आणि आळस तुम्हाला व्यापून टाकू शकतात. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. जुन्या वाहनावर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकतात.
4- एप्रिल 2024- एप्रिल महिना तुमच्याकरिता त्रासदायक असू शकतो. परंतु तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर मात कराल. या महिन्यांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील कोणाशी वाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक गोष्टींमध्ये अडथळे येऊ शकतात.
तुमचा साधेपणा व दयाळूपणाचा कोणीतरी गैरफायदा घेऊ शकतो. जर तुम्ही अविवाहित असाल तर या महिन्यांमध्ये लग्न होण्याची शक्यता आहे. या महिन्यात व्यवसायामध्ये चांगला नफा मिळेल परंतु खर्च देखील तितकाच वाढेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना सामान्य आहे.
5- मे 2024- सरकारी कामाशी संबंधित असलेले व्यक्ती या महिन्यात चांगले काम करतील. तुम्ही जर विद्यार्थीअसाल व तुम्हाला विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जायचे असेल तर या महिन्यात तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रेम प्रकरण असेल तर काही गैरसमज निर्माण होऊ देऊ नका नाहीतर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा महिना प्रगती आणि लाभाचा आहे.
6- जून 2024- या महिन्यामध्ये पैशांचे बचत होणे अशक्य आहे. घरामध्ये काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. या महिन्यांमध्ये सूर्याच्या विरुद्ध राजयोगामुळे तुम्हाला अचानक काही सिद्धी मिळेल किंवा गुप्त संपत्ती प्राप्त होऊ शकते.
सरकारकडून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. समाजामध्ये चांगला मानसन्मान मिळेल. नोकरीमध्ये काही जास्तीचे काम तुम्हाला दिले जाण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठी हा कालावधी अनुकूल आहे.
7- जुलै 2024- महिन्यामध्ये तुमचे तुमच्या पत्नी सोबतचे नाते सौहार्दपूर्ण असेल. तुम्ही तुमच्या पत्नीला काही मौल्यवान भेट देण्याची शक्यता आहे. सासरच्या लोकांकडून काही फायदा होऊ शकतो.
आणि मालमत्तेच्या बाबतीत प्रगती होण्याची शक्यता आहे. जे व्यक्ती व्यवसाय करतात त्यांना चांगले परिणाम मिळतील व समाजात प्रतिष्ठा वाढेल. तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर हा महिना त्यासाठी चांगला आहे.
8- ऑगस्ट 2024- या महिन्यामध्ये एखाद्या सामाजिक कार्याकरिता विदेश सहलीला जावे लागण्याची शक्यता आहे. या महिन्यात व्यवसायात वाढ होण्याची शक्यता देखील आहे व पैसे मिळणे देखील सोपे होईल.
नोकरीमध्ये सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नोकरीत शांतता राहील. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या कामांना वेग मिळेल. व्यवसायामध्ये देखील लाभ होईल. नोकरीमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
9- सप्टेंबर 2024- तुम्हाला परदेशातील एखाद्या व्यक्तीकडून अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात आरोग्य सुधारेल. नोकरी मध्यम राहील व व्यवसाय असेल तर व्यवसाय चांगला नफा मिळेल. आई-वडिलांच्या आरोग्याच्या संबंधित काही समस्या उद्भवतील.
व्यवसाय चांगली प्रगती होईल व नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. घरामध्ये धार्मिक विधी होतील. हा महिना प्रमोशन देऊ शकतो. लग्नाची वाट पाहणाऱ्यांसाठी चांगले संबंध येतील.
10- ऑक्टोबर 2024- या महिन्यांमध्ये तीर्थक्षेत्राची यात्रा घडू शकते. महिन्यात तुम्ही नवीन वाहन घेऊ शकतात. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आईच्या आरोग्याच्या समस्या असतील. अनोळखी व्यक्ती भेटल्यामुळे नुकसान होऊ शकते. गुंतवणूक केली असेल तर नफा वाढेल.
एखाद्या नातेवाईका कडून तुम्हाला अचानक लाभ होऊ शकतो. लग्नाची वाट पाहणाऱ्यांची या महिन्यात निराशा होईल. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चढ-उतारांनी भरलेला आहे.
11- नोव्हेंबर 2024- वैवाहिक जीवन या महिन्यात मध्यम असेल व नोकरीत जबाबदारी वाढेल. आईची आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. सासरच्या मंडळीचे सहकार्य मिळेल. मुलीच्या लग्नाची चिंता दूर होईल. काही लोकांसाठी हा महिना मुलांसाठी शुभ असू शकतो. व्यवसायामध्ये काही चढ-उतार होऊ शकतात.
नोकरीत बदल होण्याची दाट शक्यता आहे. विदेश प्रवास करण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. नोकरी सतर्क राहून कामावर लक्ष केंद्रित करा.
12- डिसेंबर 2024- या महिन्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीशी भेट होईल व ती तुम्हाला फायदा देणारे ठरेल. या महिन्याच्या मध्यावधीत जमीन आणि मालमत्तेतून आनंद मिळेल. मित्रांकडून देखील सहकार्य मिळेल. या महिन्याच्या शेवटच्या दिवसात तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल.
अविवाहित असाल तर लग्न होण्याची शक्यता आहे. नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. परंतु जर तुम्ही शुगर आणि ब्लड प्रेशर चे पेशंट असाल तर या महिन्यांमध्ये तुम्हाला आरोग्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे.