राशीभविष्य

December 2023 Weekly Horoscope: या आठवड्यात कोणाला मिळेल संपत्ती? कुणाला मिळेल करिअरशी संबंधित चांगली बातमी? वाचा आठवड्याचे राशीभविष्य

December 2023 Weekly Horoscope:- 2023 चा डिसेंबर हा शेवटचा महिना असून या डिसेंबरचा पहिला आठवडा चार ते दहा तारखेपर्यंतचा असणार आहे. या महिन्यांमध्ये प्रामुख्याने एकादशी तसेच कालभैरव अष्टमी यासारखे व्रत आणि काही सण देखील साजरी केले जाणार आहेत.

एवढेच नाही तर चंद्रासह अनेक ग्रह आपली राशी देखील बदलणार असल्यामुळे या सगळ्या स्थितीचा प्रभाव अनेक लोकांवर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने दिसून येणार आहे. त्यामुळे देशातील प्रसिद्ध ज्योतिषाकडून जाणून घेऊ की हा आठवडा तुमच्या राशीसाठी किंवा तुमच्या करिता कसा असणार आहे?

डिसेंबर 2023 साप्ताहिक राशिभविष्य

1- मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा थकवा देणार असून प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये हा आठवडा खूप आनंददायी असणार आहे. तसेच या व्यक्तींना काही आर्थिक फायदा होण्याची देखील शक्यता असल्यामुळे आठवडा आनंदात जाईल अशी एक शक्यता आहे. तसेच तुमच्या प्रियकराला भेटण्याची देखील या आठवड्यात शक्यता आहे. तुम्ही अगोदर जे काही कष्ट घेतले असतील त्याचे फळ या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. मेष राशींच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात पूर्वीपेक्षा चांगले राहील. परंतु या आठवड्यामध्ये मेष राशींच्या व्यक्तींनी इतरांबद्दल न बोललेले बरे होईल.

2- वृषभ या आठवड्यामध्ये वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य खूप चांगले राहील. नोकरीमध्ये परिस्थिती थोडी तणावपूर्वक राहण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत जर कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो या आठवड्यात घेणे गरजेचे आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले निकाल मिळतील व तरुणांना या आठवड्यात करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या कळण्याची शक्यता आहे. परंतु कुटुंबाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय असतील तर ते सर्वांनी मिळून घेतलेले बरे होईल.

3- मिथुन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यात काही जुनी अडकलेली देणे असतील तर ती मिळण्याची शक्यता आहे. तुमची इच्छा नसताना देखील तुम्हाला एखाद्या सहलीला जावे लागू शकते व त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये करिअरशी संबंधित चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोग्याबाबत जर काही निष्काळजीपणा करत असाल तर तो महागात पडू शकतो. या आठवड्यात खर्चावर नियंत्रण राहील.

4- कर्क कर्क राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात शांत रहावे असा सल्ला देण्यात आला आहे. पैशाच्या संबंधित कुठलाही निर्णय विचार न करता घेऊ नये. तसेच खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असून असे केले नाही तर बजेट बिघडण्याची शक्यता आहे. प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगला राहील व ते एकमेकांसोबत या आठवड्यात बराच वेळ घालवू शकतील. तसेच घरात या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा राहिल्याने ती फायदेशीर ठरणार आहे.

5- सिंह सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यामध्ये फक्त कामावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करणे गरजेचे आहे. कारण यामुळे येणाऱ्या काळामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत तुमचा जीवनसाथी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्ण सहकार्य किंवा साथ देईल. तुमच्या भावना व्यक्त करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल व तुमची इच्छा नसली तरीही तुम्हाला तुमच्या नोकरीत काही काम या कालावधीत करावे लागेल. या कालावधीत तब्येत सुधारण्याची अपेक्षा आहे.

6- कन्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यात व्यावसायिक भागीदाराचे सहकार्य मिळणार असून त्यामुळे काम अधिक चांगले केल्यामुळे प्रशंसा देखील होणार आहे. कुटुंबामध्ये लहान सदस्यांचे आगमन होण्याची देखील शक्यता आहे. नोकरदारांकरिता नोकरीमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. एवढेच नाही तर या कालावधीत तुमच्या विरोधात काही षडयंत्र देखील असले जाण्याची शक्यता आहे. सहलीला जाण्याची देखील संधी मिळू शकते.

7- तूळ तूळ राशींच्या व्यक्तींसाठी हा आठवडा सुखकारक असणार आहे. लोकांकडून तुमच्या कामाची आणि वागण्याची प्रशंसा केली जाईल. या आठवड्यात घरातील एखाद्या ज्येष्ठाची तब्येत बिघडू शकते. लव लाइफ ठीकठाक राहील तसेच जोडीदारासोबत वेळ घालवण्याचे संधी देखील मिळेल. या सप्ताहात आरोग्य देखील चांगले राहील. दुसरे महत्त्वाचे म्हणजे व्यवसायामध्ये जर कुठलेही मोठे पाऊल उचलायचे असेल तर ते काळजीपूर्वक विचार करूनच उचलावे. विनाकारण रागवू नका.

8- वृश्चिक वृश्चिक राशीचे व्यक्ती या आठवड्यात स्वतःवर जास्त खर्च करू शकतात. त्यामुळे आर्थिक बजेट बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक निर्णय घ्यायचा असेल तर तो विचारपूर्वक घ्यावा. छोट्या मोठ्या कामा नंतर देखील तुम्हाला थकवा जाणवेल आणि काही दिवस विश्रांती घेणे गरजेचे राहील. तसेच तुम्हाला तुमचे काम काळजीपूर्वक हाताळावे लागेल व आरोग्याच्या बाबी गांभीर्याने घ्याव्यात.

9- धनु धनु राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आरोग्य त्रास देण्याची शक्यता असून धनु राशीच्या व्यक्तींमध्ये ऊर्जेची कमतरता भासेल. कुटुंबाशी संबंधित प्रत्येक जबाबदारी योग्यरीत्या पार पाडाल तसेच उत्पन्न सुधारेल. अर्धवेळ नोकरी देखील मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये जर टारगेट दिले असेल तर ते तुम्ही वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. भावांमध्ये काही मुद्द्यांवरून वाद होण्याची शक्यता आहे व वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते.

10- मकर मकर राशीचे व्यक्ती या सप्ताहात व्यवसायामध्ये जोखीम घेण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. तुम्हाला जे खायला आवडते ते तुम्हाला आठवड्यातून अनेक वेळा मिळण्याची शक्यता आहे व तुम्हाला ते आनंदित करेल. या आठवड्यात शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायाच्या संबंधित काही योजना तुम्हाला थकवण्याची शक्यता आहे. काही वैयक्तिक गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. पत्नीचे वागणे तुम्हाला त्रास देऊ शकते.

11- कुंभ कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी या आठवड्यात व्यवसायाचे एक मोठे आव्हान असेल. नोकरीमध्ये शिस्तीचा अभाव असल्याने काही अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता आहे. भविष्यकाळासाठी काही योजना असण्याची गरज आहे. या आठवड्यामध्ये तुम्हाला असे काही निर्णय घ्यावे लागू शकतात ज्यामुळे काही लोक नाराज होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

12- मीन मीन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये व्यवसायाच्या बाबतीत काही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या भोवतीच्या नात्यांमध्ये समाधानी रहाल. या आठवड्यामध्ये तुमच्या स्वभावात बदल करणे खूप गरजेचे आहे. तुमची इच्छा नसताना तुम्हाला काही कामे करावी लागतील व त्याचा तुम्हाला त्रास होईल. घराशी संबंधित एखादी मोठी गोष्ट होऊ शकते. आठवड्यात तब्येत ठीकठाक राहील.

(टीप- ही माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही फक्त एक माध्यम म्हणून काम करत आहोत. त्यामुळे दिलेली माहिती ही केवळ माहिती म्हणूनच विचारात घ्यावी.)

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts