राशीभविष्य

Good Luck Signs : खूप शुभ मानली जातात ‘ही’ चिन्हे, दिसताच अच्छे दिन सुरु…

Good Luck Signs : सनातन धर्मात नैसर्गिक घटक आणि प्राण्यांना खूप महत्त्व दिले जाते. म्हणूनच गाय, पोपट, घुबड इ. महत्त्वाचे मानले जातात. हिंदू धर्मात गायीला माता म्हणून पूजले जाते. त्याचे दूध, शेण इत्यादी अनेक शुभ कामांसाठी वापरले जाते. दरम्यान आज आपण अशा काही चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे दर्शन तुम्हाला झाल्यास तुमचा चांगला काळ सुरु होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला काही जीव दिसले तर ते तुमच्या भावी आयुष्यासाठी काही खास संदेश देतात असे मानले जाते. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया….

पोपट

पौराणिक कथेत पोपटाला भगवान कुबेराचे प्रतीक मानले गेले आहे. हे संपत्ती आणि समृद्धीचे देखील प्रतीक मानले जाते. काही लोक हे एक चांगले चिन्ह म्हणून पाहतात. प्रेमाचा दूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामदेवाचे वाहन म्हणूनही पोपटाचा उल्लेख आहे. कोणत्याही वेळी पोपट दिसणे किंवा कोणत्याही विशेष कामाच्या वेळी दिसणे हे समृद्ध जीवनाचे लक्षण आहे.

कासव

वास्तुशास्त्रात कासवला विशेष महत्व आहे. हिंदू धर्मात कासवाला खूप शुभ मानले जाते. बरेच लोक याला संपत्ती, समृद्धी आणि स्थिरतेचे प्रतीक मानतात. इतकेच नाही तर काही लोक देवघरामध्ये त्याची स्थापना करतात आणि आशा करतात की यामुळे त्यांना समृद्धी आणि सुख आणि शांती मिळेल.

काळी मुंगी

काळी मुंगी काही धार्मिक परंपरांमध्ये शनि देवाशी संबंधित आहे, ज्याला काही लोक शुभ चिन्ह म्हणून पाहतात. त्यामुळे काळ्या मुंगीला कधीही मारू नये. त्यांचे दिसणे हे सुखी जीवनाचे लक्षण मानले जाते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts