Grah Gochar : जुलै महिन्यात अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहेत. या काळात अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होतील. अशातच, 7 जुलै रोजी असुरांचा स्वामी शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर युवराज बुध येथे आधीच बसलेले आहेत. या दोन ग्रहांच्या संयोगाने लक्ष्मी नारायण योग तयार होईल. असा योगायोग तब्बल वर्षभरानंतर घडत आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रात या राजयोगाला विशेष महत्त्व आहे. हा राजयोग सर्व राशींवर परिणाम करेल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांना सर्वाधिक फायदा होईल. कोणत्या आहेत त्या राशी चला पाहूया…
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठीही हा राजयोग उत्तम राहील. या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात संपत्तीत वाढ होईल. तसेच आर्थिक लाभ होतील. परदेशात जाण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल दिसून येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
तूळ
तूळ राशीच्या लोकांवर शुक्र आणि बुध ग्रहांची विशेष कृपा असेल. करिअर आणि व्यवसायात फायदा होईल. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. व्यवसायातही फायदा होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अतिशय शुभ राहील. नशीब पूर्ण साथ देईल. येणारे दिवस लोकांसाठी खूप शुभ असतील. उत्पन्न वाढेल. बुद्धिमत्ता आणि कौशल्ये विकसित होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पैशांची बचत होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. व्यवसायात लाभ होईल.