राशीभविष्य

Horoscope 2024: 7 मार्चनंतर ‘या’ राशींवर होईल धनवर्षाव! या योगामुळे पालटेल नशीब

Horoscope 2024:- ग्रहांच्या राशी व नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक शुभ अशुभ योग या वर्षात तयार होणार असून या परिस्थितीचा परिणाम हा वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पाहायला मिळणार आहे. जर योग तयार होण्याची स्थिती पाहिली तर जेव्हा एखाद्या राशीमध्ये एकापेक्षा जास्त ग्रह येतात तेव्हा अशा प्रकारचे शुभ अशुभ योग तयार होत असतात.

अगदी याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले तर शनिदेवाने तीस वर्षांनी स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीमध्ये प्रवेश केला आहे व येणारे फेब्रुवारीमध्ये सूर्यदेव देखील कुंभ राशीत प्रवेश करणार आहे व सात मार्चला शुक्र कुंभ राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे सूर्य, शुक्र आणि शनी या तीनही ग्रहांमुळे त्रिग्रही योग तयार होणार असल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीचीच माहिती या लेखात आपण घेऊ.

 सात मार्चनंतर या राशींचे पालटणार नशीब

1-वृषभ तयार होणारा हा त्रिग्रही योग या राशींच्या व्यक्तींकरिता खूप फायद्याचा ठरणार असून या कालावधीमध्ये या व्यक्तींना खूप मोठी नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर प्रत्येक कामात यश मिळेल असे देखील शक्यता आहे. वृषभ राशीचे व्यक्ती जर नोकरी करत असतील तर त्यांना प्रमोशन मिळण्याची संधी आहे. काही जुनी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होऊ शकतो. तसेच या कालावधीमध्ये हे व्यक्ती वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.

2- मकर त्रिग्रही योगामुळे मकर राशींच्या व्यक्तींना आर्थिक दृष्टिकोनातून फायदा होणार असून व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ मिळेल अशी देखील शक्यता आहे. तसेच या व्यक्तींचा समाजामध्ये मानसन्मान वाढीस लागेल व प्रतिष्ठा देखील वाढेल. तसेच बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता या कालावधीत आहे. कुटुंबातील वातावरण देखील आनंदी आनंदित राहील.

3- मेष हा योग मेष राशींच्या व्यक्तीकरिता देखील शुभ असून सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकणार आहेत. मेष राशींच्या व्यक्तींना त्यांच्या आर्थिक आणि करिअर मध्ये देखील नवीन संधी मिळणार आहेत. या कालावधीत मेष राशींच्या व्यक्तींना भरपूर प्रमाणात पैसे मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार किंवा लॉटरीमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे ठरू शकते व त्यासोबतच सोन्यात गुंतवणूक करणे देखील फायद्याचे ठरू शकते. जर काही कोर्ट कचेरीचे प्रकरणे असतील तर तुम्हाला त्या माध्यमातून दिलासा मिळू शकतो.

( टीपवरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही माध्यम म्हणून काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करीत नाहीत.)

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts