Horoscope 28 February : ज्योतिषशास्त्राकडून आजचे राशिभविष्य सादर करण्यात आले आहे. यामध्ये काही राशींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे तर काही राशीच्या लोकांना अडचणी येण्याची शक्यता आहे. ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव राशीवर जन्मकुंडलीवर पडत असतो. त्यामुळे दररोज प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळे प्रसंग पडत असतात.
आजचे राशिभविष्य
मेष
मेष राशीच्या लोकांना आज जुन्या आजारापासून आराम मिळेल. नवीन लोक भेटण्याची शक्यता आहे. आजचा दिवस चांगला जाणार आहे. गुंतवणूक करणार असाल तर जरा थांबा. वैवाहिक जीवन चांगले राहील. कौटुंबिक समस्या निर्माण होऊ शकतात.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आज अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होऊ शकते. प्रिय जोडीदारासोबत लॉग ड्राईव्हवर जाण्याचा प्लॅन करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांना आज काही प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे. व्यवसायात काम करताना काळजी घेण्याची गरज आहे. तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस शुभ असेल. मात्र व्यवसायात काळजी घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी टीमवर्क तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश मिळेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या काही बोलण्यावर मित्रांना राग येऊ शकतो. आजचा दिवस चांगला असेल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांचे आज आरोग्य सुधारेल. कोणत्याही निविदा अडकल्या असतील तर ते काम पूर्ण होऊन कामच वेग वाढेल. तुमचा तणाव देखील दूर होईल. व्यवसायासाठी परदेशात जाऊ शकता. आवडत्या कामात नक्कीच यश मिळेल. आजचा दिवस चांगला जाईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात वाईट प्रसंग येऊ शकतात. निष्काळजीपण तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र तुमच्या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. चांगल्या लोकांबरोबर राहण्याचा प्रयत्न करा.
धनु
धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस वाद घालणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी वर्तन योग्य ठेवा. विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. घशाच्या दुखण्याने त्रास होऊ शकतो.
मकर
मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. अनेक दिवसांपासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना नक्कीच यश मिळेल. वैवाहिक जीवनात रोमान्समुळे तुमचे संबंध चांगले होण्याची शक्यता आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज भांडण टाळण्याची गरज आहे. खर्च वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदारासाठी वेळ काढा. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. चिंतेत राहण्याची शक्यता आहे.
मीन
व्यवसायात रखडलेली कामे आज पूर्ण होतील. मात्र व्यवसायातील काही कामांबाबत चिंतेत राहू शकता. वैवाहिक जीवनातील महत्त्वाचे काम वेळ देऊन पूर्ण करा. तुम्हाला आज काही प्रमाणात थकवा जाणवण्याची शक्यता आहे.