Horoscope March : मार्च महिन्यात वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. तसेच या महिन्यात होळी देखील आहे. हिंदू धर्मियांचे नवीन वर्ष देखील याच महिन्यात सुरु होत असते. हे सर्व होत असतानाच अनेकांच्या राशींवर ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव पडणार आहे. अनेकांची लव्ह लाईफ चांगली ठरेल तर अनेकांना यामध्ये काही अडचणी देखील. तसेच अनेकांना आर्थिक लाभ देखील होणार आहे.
मेष
मेष राशीच्या लोकांना मार्च महिन्यात व्यवसायात चांगला लाभ मिळेल. व्यवसायात सुधारणा देखील होईल. मार्च महिन्यात आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. वैवाहिक जीवन चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. लव्ह लाईफसाठी मार्च महिना चढ-उतारांनी भरलेला असेल.
वृषभ
वृषभ राशीसाठी पुढील महिना अडचणींचा ठरू शकतो. लांबच्या प्रवासामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. लव्ह लाईफमध्ये तणाव निर्माण होईल. तुमच्या प्रियकराशी तुमचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष देणे गरजेचे आहे.
मिथुन
मिथुन राशींसाठी मार्च महिना धोकादायक ठरेल. गुप्त संबंधातून बाहेर येण्याचा प्रयत्न करावा लागेल अन्यथा त्यांची बदनामी होऊ शकते. वैवाहिक जीवनासाठी मार्च महिना चांगला असेल.
व्यवसाय सुरु करण्यासाठी हा महिना खास आहे. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याची शक्यता आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना मार्च महिन्यात चांगला फायदा होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. प्रेम जीवनासाठी हा महिना खास असेल. या महिन्यात प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. विद्यार्थी चांगला अभ्यास करतील. आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
सिंह
मार्च महिन्यात सिंह राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही या महिन्यात कायदेशीर कचाट्यात अडकू शकतात. व्यवसायात देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे.
कन्या
मार्च महिन्यात विचार न करता पैसे न गुंतवण्याचा सल्ला कन्या राशीच्या लोकांना देण्यात आला आहे. अचानक लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मात्र या महिन्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
प्रेम जीवनात प्रचंड यश मिळेल. वैवाहिक जीवन देखील सुखकर असेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी देखील यश मिळेल.
तुळ
तुळ राशीच्या लोक मार्च महिन्यात नवीन कार खरेदी करू शकतात. तसेच मालमत्ता खरेदी करण्याचा विचार असेल तर तो देखील पूर्ण होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. लव्ह लाईफसाठी हा महिना चांगला ठरणार नाही. मात्र आर्थिक दृष्ट्या हा महिना चांगला असेल.
वृश्चिक
मार्च महिन्यात तुम्हाला काही आरोग्याशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात. छातीत जळजळ होण्याची शक्यता आहे. पोट बिगण्याची शक्यता आहे. प्रेमात हा महिना चांगला असेल मात्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला असेल.
धनु
कौटुंबिक जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. व्यवसायात तुमचे उत्पादन वाढवण्यावरच लक्ष द्या. प्रेमासाठी हा महिना चांगला असेल. भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी मार्च महिना चांगला असेल. कौटुंबिक जीवनात सुधारणा होतील. आर्थिक फायदा होईल. वैवाहिक जीवनात भरपूर रोमान्स असेल. बाहेरच्या लोकांमुळे कुटुंबात समस्या निर्माण होऊ शकतात.
कुंभ
कुंभ राशीसाठी मार्च महिना वैवाहिक जीवनात समस्या आणू शकतो. प्रेमात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. फसवणूक होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीर काम करू नका. विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला असेल.
मीन
मिन राशीसाठी मार्च महिना सुरुवातीलाच अडचणींचा ठरू शकतो. मानसिक तणाव वाढू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा आर्थिक समस्या येऊ शकतात.
उत्पन्नात वाढ होईल. प्रेम जीवन सुधारेल. व्यवसायासाठी हा महिना कुमकुवत असेल. कोणतेही नवीन काम करण्याचा प्लॅन आखू नका. नोकरीत यश मिळेल.