Horoscope Today : मार्च महिन्याचा आज पहिला दिवस आहे. या महिन्यात चंद्रग्रहण देखील होणार असल्याने राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव देखील पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आजचे राशिभविष्य देखील जाहीर करण्यात आले आहे.
मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने खास असणार आहे. मुलांना पालकांचे सहकार्य लाभेल. कामावर लक्ष केंद्रित करा. महिलांना आज विशेष काळजी घेण्याची गरज अन्यथा पतीसोबत मतभेद होतील.
वृषभ
वृषभ राशीचे लोकांना आज तणावातून आराम मिळेल. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारच वाढू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याबाबत काळजी घ्या.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांचा आच दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होईल. घरामध्ये मतभेद होऊ शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या.
कर्क
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. नवीन व्यवसायासाठी काम करू शकता. नोकरीच्या ठिकाणी कामावर लक्ष द्या. आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकता. कुटुंबातील संबंध सुधारण्यावर भर द्या.
सिंह
सिंह राशीचे लोक आज व्यवसायात बदल घडवून आणू शकतात. व्यवसायाचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.
कन्या
मालमत्तेसंदर्भात जुनी प्रकरणे मार्गी लागतील. व्यवसायात बऱ्याच दिवसानानंतर नफा मिळेल. प्रेम जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आजचा दिवस आनंदात जाईल.
तूळ
आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला असेल. उत्पन्नात वाढ होईल. परदेशात जाऊन शिक्षण घेईचे असेल तर हा काळ सर्वोत्तम आहे. मात्र आज तुम्हाला अस्वस्थ वाटेल. काम करण्याची शैली बदलू शकता.
वृश्चिक
तुम्हाला आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज नोकरी गमावण्याची भीती असू शकते. नातेवाईकांमध्ये असलेल्या वादात पडू नका.
धनु
धनु राशीचे लोक आज व्यवसायात नफा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. व्यवसायात तुमचे उत्पन्न वाढेल. कामाच्या लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीसाठी आजचा दिवस शुभ असेल. तुमच्या व्यवसायाला चालना मिळेल. व्यवसायात एक नवीन वेगळी ओळख निर्माण होईल. ऑफिसच्या कामासाठी प्रवास करू शकता. नोकरीच्या ठिकाणी काळजीपूर्वक काम करावे लागेल.
कुंभ
आज तुम्ही व्यवसायात पैसे गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. मानसिक तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायासाठी आजचा दिवस खास असणार आहे.
मीन
आज तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. तसेच करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. मन भरकटू देऊ नका. आज काही प्रमाणात अडचणी येऊ शकतात.