Personality Test:- दररोज आपण अनेक लोकांना भेटत असतो व प्रत्येक लोकांची बोलण्याची व काम करण्याची तसेच इतर हावभाव अशा सगळ्याच पद्धतीमध्ये आपल्याला वेगळेपण दिसून येते. साधारणपणे एखादा व्यक्ती चांगला आहे किंवा तो वाईट आहे किंवा त्याचा स्वभाव थोडासा तिरसट आहे अशा गोष्टी आपण तो आपल्याशी कसा बोलला यावरून आपण बऱ्याचदा अंदाज लावत असतो.
परंतु त्याच्या वागण्या बोलण्यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभावाबद्दल आपण पूर्ण अंदाज लावू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला पूर्णपणे आपण ओळखू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल कसे ओळखावे किंवा त्याचा स्वभाव कसा आहे? हे कसे ओळखावे हे शरीराच्या अवयवांच्या आकारावरून देखील आपल्याला ओळखता येते.
याप्रकारे जर तुम्हाला एखादा व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व ओळखायचे असेल तर व्यक्तीचे डोळे, नाक तसेच त्याचे ओठ, हात आणि पायांच्या आकाराच्या आधारे देखील आपण संबंधित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ओळखू शकतो.
अगदी याच प्रकारे आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचे व्यक्तिमत्त्व त्याच्या हाताच्या बोटांच्या आकाराच्या आधारे देखील जाणून घेऊ शकतो. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघू.
हाताची बोटे पहा आणि व्यक्तीचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व ओळखा
1- तर्जनी आणि अनामिका- आताच्या बोटांवरून आपण स्वभाव आणि एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सहजपणे जाणून घेऊ शकतो. समजा एखाद्या व्यक्तीची तर्जनी त्याच्या अनामिकापेक्षा लहान असेल तर जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता असू शकते.
तसेच जीवनामध्ये अनेक छोट्या छोट्या प्रसंगावरून ते निराश होतात. तसेच प्रत्येक गोष्टी यशस्वी होण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात.परंतु त्यांना सहजासहजी यश मिळत नाही. असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे देखील बऱ्याचदा नुकसान करून टाकतात.
2- हाताची बोटे लांब असणे- काही लोकांच्या हाताचे बोटे खूप लांब आणि पातळ असतात. जीवनामध्ये असे लोक नेहमी इतरांना मदत करण्यासाठी तयार असतात व ते विश्वास ठेवण्यालायक असतात.
तसेच ते आंधळेपणाने देखील एखाद्यावर विश्वास ठेवतात. ज्या लोकांचे तर्जनी लांब असते ते खूप बुद्धिमान असतात व हे लोक कोणाचीही परवा करत नाही व आपले ठरवलेले ध्येय सहजपणे साध्य करतात.
3- तर्जनी आणि अनामिका समान असणे- ज्या लोकांच्या हाताची तर्जनी आणि अनामिका सारख्या आकाराची म्हणजे समान असतात असे लोक जीवनामध्ये खूप प्रामाणिक असतात व ते त्यांची कामे जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करतात.
नाहीतर ते जीवनातील सर्व कामांच्या बाबतीत आणि नातेसंबंधांबद्दल खूप गंभीर असतात व फसवणूक करणारे लोक त्यांना अजिबात आवडत नाहीत.