Numerology Horoscope 2024:- सोमवारपासून 2024 या वर्षाची सुरुवात झाली असून अनेक जणांनी अनेक नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा संकल्प किंवा काही दैनंदिन जीवनामध्ये बदल करण्याचा संकल्प केला असेल.
तसेच अनेक नवीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी बऱ्याच प्लॅनिंग या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कित्येक जणांनी केले असतील. कारण नवीन वर्षामध्ये नावीन्यतेचा ध्यास घेऊन अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे बदल करत असतात.
अगदी या नवीन वर्षामध्ये ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून देखील अनेक ग्रहांनी देखील काही बदल केले आहेत व काही करणार आहेत. त्यामुळे त्यांचा थेट परिणाम हा बारा महिने त्या त्या राशींच्या व्यक्तींवर राहणार आहे.
त्यासोबतच अंकशास्त्रानुसार देखील 2024 हे वर्ष कसे राहील? हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे. याच अनुषंगाने या लेखांमध्ये मुलांक 1 असलेल्या व्यक्तींसाठी 2024 वर्ष कसे राहील? याबाबतची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींसाठी 2024 हे वर्ष कसे राहील?
जर आपण एक या संख्येचा स्वामी पाहिले तर तो सूर्य असून मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींकरिता सूर्य,बुध, गुरु आणि शुक्र यांच्यासोबत शुभ योग तयार होत असल्यामुळे एक मुलांक असणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील. तसेच त्यांना पैशांचा लाभ देखील होईल.
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होईल व जे बेरोजगार असतील त्यांना नोकरी मिळेल.मुलांना विविध क्षेत्रात यश मिळाल्यामुळे पालक आनंदित राहतील. मुलांक एक असलेल्या अविवाहित मुलींचे लग्न यावर्षी होण्याची शक्यता आहे.
तसेच अपत्य प्राप्तीची इच्छा असणाऱ्या महिलांची इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होणार आहे. ज्या व्यक्तींना प्रमोशनची इच्छा आहे त्यांचे प्रमोशन होण्याची शक्यता असून यावर्षी ज्यांचे लग्न होईल त्यांचे जीवन आनंदी असणार आहे.
जर काही व्यक्तींना पेन्शनसंबंधी काही समस्या असतील तर त्या दूर होतील. मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींचा यावर्षी आर्थिक तसेच कायदेशीर व कौटुंबिक वाद मिटण्यास मदत होईल. मुलांक एक असणाऱ्या व्यक्तींनी या नवीन वर्षामध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
पोटाशी काही संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता देखील आहे. काहींना विदेशात जायचे असेल परंतु काही अडथळे असतील तर ते दूर होतील. एकंदरीत पाहता एक या संख्येसाठी संपूर्ण वर्ष हे पॉझिटिव असणार आहे.
अशाप्रकारे जाणून घ्या तुमचा मुलांक काय आहे?
तुम्हाला देखील तुमचा मूलांक काय आहे ते जाणून घ्यायचे असेल तर तुमची जन्मतारीख तुम्हाला सिंगल डिजिट म्हणजेच एकेरी अंकात काढणे गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुमची जन्मतारीख जर 21 असेल तर तुमचा मुलांक हा 2+1=3 असतो.
परंतु यामध्ये लक्षात घ्यावे की दोन अंकांमध्ये जर मुलांक आला तर त्या दोन अंकांची पुन्हा बेरीज करावी. म्हणजे समजा तुमची जन्मतारीख 29 आहे. तर जन्मतारखेनुसार तुमचा मूलांक हा 9+2=11 होतो. अशावेळी उत्तरामध्ये दोन अंक आले तर पुन्हा त्या दोन अंकांची बेरीज करावी.
म्हणजेच 1+1=2 म्हणजेच 29 जन्मतारीख असलेल्या व्यक्तींचा मुलांक हा दोन असतो. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा मूलांक शोधू शकतात.