Numerology Science:- अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झालेला आहे त्यावरून संबंधित व्यक्तीचा मूलांक काढला जातो व त्या मुलांकावरून व्यक्तीचे भविष्य म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्व कसे असू शकते किंवा त्याचा स्वभाव कसा राहील? जीवनामध्ये तो यशस्वी होईल आणि कोणत्या क्षेत्रात होईल?
तसेच महत्त्वाचे म्हणजे जीवनात त्याची आर्थिक परिस्थिती कशी राहील? इत्यादी बाबत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला मिळते. तसे पाहायला गेले तर अंकशास्त्र हा एक ज्योतिष शास्त्राचा भाग असून यामध्ये अंकांद्वारे व्यक्तीच्या जीवनाबद्दल आणि भविष्याविषयीची विविध प्रकारची माहिती आपल्याला मिळत असते.
यामध्ये जन्मतारखेचे जे काही दोन अंक असतात त्यांची बेरीज करून जो अंक मिळतो त्याला मुलांक म्हटले जाते व या मुलांकावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा भविष्याबद्दल माहिती मिळत असते.
अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच, 14 किंवा 23 तारखेला झालेला असेल तर अशा व्यक्तींचा मुलांक पाच असतो व पाच मुलांक म्हणजेच या दिलेल्या तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे पुढील आयुष्य कसे राहील? याबद्दलची देखील महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला अंकशास्त्रामध्ये मिळते.
पाच मुलांक असलेल्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि आयुष्य कसे असते?
1- कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतात- ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या पाच, 14 किंवा 23 तारखेला झालेला असतो अशा लोकांचा मुलांक पाच असतो व या मुलांकाचा शासक ग्रह हा बुध असून त्यामुळे या मूलांक असलेल्या व्यक्तींना ज्ञान आणि बुद्धिमत्ता मिळण्यास मदत होते.
बुध या शासक ग्रहाच्या प्रभावामुळे हे व्यक्ती खूप बुद्धिमान असतात आणि कष्टाच्या जोरावर ते कुठल्याही क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण असे यश मिळवतात. विशेष म्हणजे या व्यक्तींना जीवनात कुठल्याही गोष्टीत अपयशाला सामोरे जावे लागत नाही.
2- कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यास असतात तयार-
या तारखांना जन्मलेले व्यक्ती म्हणजेच पाच मुलांक असलेली व्यक्ती जीवनामध्ये खूप धाडसी रीतीने जगतात आणि कुठल्याही गोष्टींना ते घाबरत नाहीत.जीवन जगत असताना कशीही अवघड आव्हाने आली किंवा परिस्थिती उद्भवली तरी न डगमगता ते त्या परिस्थितीला किंवा आव्हानांना तोंड देतात व त्यातून मार्ग काढतात. कितीही मोठ्या संकटांमध्ये ते खंबीरपणे उभे असतात.
3- जोखीम घ्यायला आवडते- पाच मुलांक असलेल्या लोकांना कुठल्याही गोष्टींमध्ये जोखीम पत्करायला खूप मोठ्या प्रमाणावर आवडते.विशेष म्हणजे जीवन जगत असताना ते कोणत्याही गोष्टींमध्ये जोखीम स्वीकारतात व त्यासाठी नेहमीच तयार असतात.
हा गुण त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी कुठला जरी व्यवसाय सुरू केला तर त्यांना भरपूर यश मिळते. तसेच कुठलीही प्लॅनिंग करण्यामध्ये ते खूपच तरबेज असतात व त्यामुळे त्यांना खूप मोठे फायदे देखील मिळतात.
4- उच्च शिक्षण प्राप्त करतात- पाच मुलांक असलेली व्यक्ती जीवनामध्ये वाचन आणि लेखनात देखील खूप हुशार असतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे आणि श्री गणेशाच्या आशीर्वादामुळे हे लोक उच्च शिक्षण प्राप्त करतात आणि त्यामुळेच त्यांना भविष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर यश मिळते.