ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर प्रत्येक ग्रह हे एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असतात म्हणजेच राशी परिवर्तन करत असतात. या राशी परिवर्तनासाठी प्रत्येक ग्रहाला एक ठराविक कालावधी लागत असतो. अगदी याच प्रमाणे आपण कर्म फळाची देवता म्हणून ओळखले जाणारे शनि महाराज यांचे उदाहरण घेतले तर त्यांना सर्वाधिक कालावधी हा राशी परिवर्तनासाठी म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी लागतो व हा कालावधी साधारणपणे अडीच वर्षाचा असतो.
साधारणपणे 2023 च्या सुरुवातीला शनिच्या स्वामित्वाची रास कुंभ मध्ये प्रवेश केला होता व कुंभ राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी 2025 च्या मध्यावरील महिन्यांमध्ये हे परिवर्तन होऊ शकते. त्यानुसार 2025 यावर्षी शनीच्या प्रभावाखालील काही राशी बदलतील पण त्यापूर्वी येणारे पुढील 15 ते 16 महिने काही राशींना अत्यंत सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकणार आहेत व या कालावधीत काही राशींच्या व्यक्तींना प्रचंड प्रमाणात धनलाभ आणि प्रगतीच्या संधी मिळणार आहेत. त्यामुळे आपण या लेखात या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते पाहू?
शनि देवाच्या कृपेने या राशींना मिळेल प्रचंड धनलाभ?
1- मकर– कुंभेचा शनी मकर राशीला लाभस्थानात येतो. त्यामुळे कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु आणि षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत. परंतु तरीपण अति हट्टीपणाला मुरड घालण्यातच आपला फायदा होऊ शकतो. मंगळाच्या वृश्चिक राशीला शनीचा कायम विरोध राहील.
त्यामुळे कौटुंबिक कलह दूर राहतील व स्थावर इस्टेट मालमत्ता शेतीच्या खरेदी विक्रीतून मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. मकर राशीच्या व्यक्तींचे काही कोर्ट कचेरी मध्ये प्रकरणे प्रलंबित असतील तर निकालामध्ये यश मिळू शकते. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
2- मिथुन– 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच शनीचा प्रभाव मिथुन राशीतून कमी झाल्यामुळे मिथुन राशींच्या व्यक्तींवर जो काही साडेसातीचा प्रभाव होता तो देखील संपुष्टात आला होता. त्यामुळे 2025 पर्यंत हे सुख असेच मिळू शकते. या कालावधीत मिथुन राशींच्या व्यक्तींना जर काही महत्त्वाच्या संधी मिळतील तर ते सोडू नये.
शनिदेव मिथुन राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीत नवव्या स्थानी भ्रमण करत आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना खूप नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. विदेश यात्रेचे देखील संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मीडियाशी संबंधित व्यवसायात असलेल्या व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतील असे संकेत आहेत. प्रवाशा दरम्यान ज्या ओळखी होतील त्या जर तुम्ही नीट पद्धतीने हाताळल्या तर भविष्यात यापासून देखील चांगला फायदा होऊ शकतो.
3- वृषभ– वृषभ राशीच्या दशम स्थानांमध्ये शनीचे आगमन हे खूप फायद्याचे ठरू शकणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींनी पैशांचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. नोकरी किंवा उद्योगधंद्याच्या ठिकाणी तुमच्यात असलेल्या निर्णय क्षमतेचा उपयोग खूप फायद्याचा ठरू शकणार आहे यामुळे येणाऱ्या काळात प्रचंड धनलाभ होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणात काही समजुतीने घेणे फायद्याचे ठरेल. तुमच्या स्तुती करणाऱ्या व्यक्तींपासून दोन हात दूर राहणेच फायद्याचे ठरेल परंतु मैत्री मात्र जपावी.
( टीप– वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही माध्यम म्हणून काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करीत नाहीत.)