Secret of Dreams : रोज रात्री झोपल्याबरोबर आपण स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश करतो. स्वप्नांमध्ये आपल्याला कधी-कधी परिचित गोष्टी दिसतात तर कधी-कधी आपल्याला पूर्णपणे अपरिचित दृश्ये दिसतात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण अशी स्वप्ने का पाहतो किंवा आपल्याला पडलेल्या स्वप्ननांचा काय अर्थ असेल? लक्षात घ्या, विज्ञानानुसार प्रत्येक गोष्टीमागे काही न काही कारण असते, तसेच स्वप्नांचे देखील आहे. विज्ञानानुसार स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. होय, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञानात अनेक प्रकारचे संशोधन झाले आहे.
त्याच वेळी, वेगवेगळ्या ठिकाणच्या धार्मिक श्रद्धा देखील स्वप्नांबद्दल अनेक गोष्टी सांगतात. अनेक ठिकाणी असे मानले जाते की स्वप्ने भविष्य दर्शवतात. विज्ञानाने हे सिद्ध केले नसले तरी काही धार्मिक आणि सामाजिक समजुतींनुसार स्वप्नांचा अर्थ सांगितला आहे. ज्योतिष शास्त्रांतर्गत, स्वप्नांची चिन्हे स्पष्ट केली आहेत. आजच्या या लेखात आपण अशाच काही स्वप्नांचा अर्थ जाणून घेणार आहोत, जे तुम्ही कधी पहिली असतील.
या गोष्टी स्वप्नात पाहण्याचे संकेत !
-जर तुम्ही कधी तुमच्या स्वप्नात उंदीर पहिला असेल तर ते एक चांगले चिन्ह आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. स्वप्नात उंदीर पाहणे म्हणजे गरिबी दूर करणे आणि समृद्धीचे आगमन होणे.
-स्वप्नात गाय दिसणे देखील खूप शुभ मानले जाते. दूध देणारी गाय पाहिली म्हणजे तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. जर तुम्हाला डाग असलेली गाय दिसली तर ते व्यवसायात नफा होण्याचे लक्षण आहे.
-तुमच्या स्वप्नात तुम्ही सापाला बिळातून बाहेर पडताना पहिले तर धनप्राप्तीचे लक्षण आहे. याचा अर्थ असा की लवकरच तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळणार आहेत.
-जर तुम्हाला स्वप्नात सोने दिसले तर ते देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या जीवनात संपत्तीत वाढ होणार आहे.
-स्वप्नात एखादी स्त्री नाचताना दिसली तर तेही खूप शुभ असते. म्हणजे येणाऱ्या काळात तुम्हाला फायदा होईल किंवा आर्थिक लाभ मिळेल.