Shani Kanya Rashifal 2024:- शनि किंवा शनीची साडेसाती म्हटले म्हणजे प्रत्येकच व्यक्ती याला घाबरतो. म्हटले जाते की शनीची साडेसाती म्हणजे खूप त्रासदायक असते किंवा या साडेसात वर्षांमध्ये खूप त्रास सहन करावा लागतो. आता शनि देवाचा विचार केला तर शनि देवाला न्यायाची देवता म्हणून ओळखले जाते.
तसेच शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत.परंतु तरी देखील ते एकमेकांचे शत्रू आहेत असे देखील मानले जाते. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये 2024 या वर्षाची सुरुवात होणार असून या वर्षांमध्ये कुठल्या राशींवर प्रभाव असेल आणि असेल तर तो किती नुकसानीचा किंवा फायद्याचा असेल हे देखील पाहणे महत्त्वाचा आहे. या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये 2024 या वर्षात कन्या राशीच्या व्यक्तींवर शनिचा प्रभाव कसा असेल? याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
कन्या राशींच्या व्यक्तींवर 2024 मध्ये शनीचा प्रभाव फायद्याचा राहील की नुकसानीचा?
2024 या वर्षांमध्ये शनी कन्या राशि पासून सहाव्या स्थानात असेल. त्यामुळे शनीची ही जी काही स्थिती आहे ती संमिश्र परिणाम देणारी आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुमची एखादी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे व ती तुम्हाला व्यवसाय मध्ये प्रगती करण्यासाठी खूप मदत करेल.
जे व्यक्ती राजकारणामध्ये असतील त्या लोकांना राजकारणाशी संबंधित चांगले पद किंवा इच्छा असलेले पद मिळू शकते. तसेच या वर्षांमध्ये आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आरोग्यामध्ये काही चढ-उतार असतील. मुलांमुळे तुमचा आदर कमी होऊ शकतो.
एखाद्या वेळी विनाकारण वादाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही नोकरी करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची इच्छा नसताना देखील काही काम करावे लागू शकते.परंतु 30 जून ते 15 नोव्हेंबर हा शनीचा भारी प्रतिगामी काळ आहे.
दरम्यान शनीच्या पूर्वगामी काळात कन्या राशींच्या लोकांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच एखाद्या वेळी नोकरी बदलण्याची देखील स्थिती उत्पन्न होऊ शकते.
तुमच्या जवळच्या मित्राशी संबंधित एखादी वाईट बातमी तुम्हाला त्याच्यापासून तोडू शकते. तसेच विनाकारण पोलीस स्टेशनला देखील जावे लागू शकते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कागदावर सही करण्याअगोदर तो संपूर्णपणे वाचून घेणे खूप गरजेचे आहे.
यासाठी कन्या राशी असलेल्या व्यक्तींसाठी शनीचे उपाय
दर शनिवारी शनीच्या मूर्तीवर मोहरीचे तेल अर्पण करावे आणि आरती करावी. प्रत्येक अमावस्येला कुष्ठरोगांना पुरी खाऊ घालावी. चपला, कपडे इत्यादी गोष्टी गरीब लोकांना दान करावे. दर शनीवारी शनिदेवाला उडदाची खिचडी अर्पण करावी व घरामध्ये शनि यंत्र बसवून रोज त्याची पूजा करावी.
(टीप– वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही फक्त माध्यम म्हणून काम करत आहोत. यासंबंधी कुठलेही उपाय करताना या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.)