Surya Gochar 2024:- ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर प्रत्येक ग्रह हा कालांतराने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो व यालाच आपण गोचर असे म्हणतो.
अशाप्रकारे ग्रहांचे गोचर किंवा राशी बदलामुळे प्रत्येक राशीवर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. तसेच अशा राशी परिवर्तनामुळे दोन ग्रहांची युती होऊन काही राजयोग देखील तयार होतात व याचा देखील परिणाम बारा राशींवर आपल्याला दिसून येतो.
अगदी याचप्रमाणे जर आपण सूर्याचा विचार केला तर ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्याला आदर, यश तसेच आत्मा व पिता असे मानले जाते. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे व मेष राशी त्यांची उच्च मानली जाते. तूळ राशी मात्र सूर्याची निम्न राशी मानली जाते.
सूर्य जेव्हा आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा राशीचक्र तसेच एकंदरीत मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर 15 डिसेंबर रोजी सूर्याने गुरुची राशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनु राशीमध्ये प्रवेश केला आहे आणि 14 जानेवारी 2025 पर्यंत सूर्यदेव धनु राशीतच राहणार आहेत.
त्यामुळे बारा राशींपैकी काही राशींवर याचा खूप सकारात्मक आणि फायदेशीर असा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे या लेखात आपण अशा कोणत्या राशी आहेत की त्यांना सूर्याच्या गोचरमुळे फायदा होईल त्या राशी बघू.
सूर्याच्या गोचरमुळे या राशींना होईल भरपूर फायदा
1- सिंह राशी- सूर्याचे जे काही धनु राशीमध्ये संक्रमण किंवा गोचर झालेले आहे ते या राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायद्याचे ठरणार आहे व या काळात हे व्यक्ती प्रवास करू शकतात व व्यवसायात देखील अनेक कमाईचे स्त्रोत निर्माण होण्यास मदत होणार आहे.
इतकेच नाहीतर सिंह राशीचे व्यक्ती या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत करण्यामध्ये देखील यशस्वी होऊ शकतील. आरोग्य एकदम ठणठणीत राहील व आर्थिक परिस्थिती देखील मजबूत होण्यास मदत होईल.
या कालावधीत भविष्याकरिता जर काही गुंतवणूक करायची असेल तर ती फायद्याची ठरू शकते. तसेच धार्मिक सहलींचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे व या कालावधीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कोर्टाच्या संबंधित काही प्रकरणे असतील तर त्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
2- वृश्चिक राशी- सूर्याचे हे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. जानेवारी महिन्यापर्यंत पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील व कष्टाचे फळ मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायामध्ये खूप मोठा आर्थिक फायदा होईल व भागीदारीत केलेल्या व्यवसायात नफा देखील चांगला मिळण्याची शक्यता आहे
व या परिस्थितीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल व रखडलेले कामे असतील तर असे कामे पूर्ण होण्याला गती मिळेल. नोकरदार व्यक्तींना नोकरीमध्ये प्रमोशन आणि प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक सदस्यांमध्ये विश्वास वाढेल व सामाजिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल.
3- मेष राशी- सूर्याचे धनु राशीमध्ये होणारे गोचर म्हणजे संक्रमण हे मेष राशीच्या व्यक्तींसाठी भाग्याचे आहे. या कालावधीत अडकलेले पैसे परत मिळतील व नशीब प्रत्येक गोष्टीत तुमच्या बाजूने असेल. या कालावधीत प्रवास घडण्याची शक्यता आहे व नोकरी तसेच व्यवसायामध्ये मोठे यश मिळेल.
धार्मिक कार्यामध्ये आवड वाढेल तसेच नोकरदार व्यक्तींना नोकरीमध्ये अनेक संधी निर्माण होतील. व्यवसायिकांना व्यवसायामध्ये लाभ होईल. भागीदारांशी व्यवसायामध्ये चांगले संबंध प्रस्थापित होतील व काही जण जर सट्टेबाजीशी संबंधित क्षेत्रात असतील तर त्यातून देखील बरेच फायदे मिळू शकतात.
4- धनु राशी- धनु राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण खूप भाग्याचे ठरणार आहे. नोकरदार लोकांना प्रत्येक टप्प्यावर नशिबाची मोठी साथ मिळेल.भागीदारीमध्ये व्यवसाय असेल तर खूप मोठा फायदा होईल.
आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल व कुटुंबातील संपत्तीचे संबंधित कुठलाही वाद असेल तर तो मिटण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी जुनी गुंतवणूक केली असेल तर चांगला फायदा होईल. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे. आरोग्य ठणठणीत राहील व कौटुंबिक आणि प्रेम जीवन देखील आनंदी असे राहील.