Trigraha Yoga:- या नवीन वर्षामध्ये अनेक ग्रह राशी परिवर्तन करत असल्यामुळे या परिवर्तनाचा सकारात्मक व त्यासोबतच काही नकारात्मक परिणाम काही राशींवर दिसून येणार आहे. सध्या ग्रहांच्या परिवर्तनामुळे अनेक शुभ योग देखील जुळून येत आहेत.
शुभ योगांचा परिणाम देखील काही राशीसाठी खूप फायदा देणारा ठरणार आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तयार होणारे योग व त्यांचा राशींवर होणारा परिणाम हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घेणे खूप गरजेचे आहे. जर आपण यामध्ये बुध या ग्रहाचा विचार केला तर तो वृश्चिक राशीत मार्गी झाला असून जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बुध ग्रहांनी पुन्हा एकदा धनु राशीमध्ये प्रवेश केला आहे किंवा करणार आहे.
सध्या धनु राशि मध्ये सूर्य आणि मंगळ हे स्थित आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रहांच्या योगामुळे आदित्य मंगल राजयोग तयार झाला आहे. त्यातल्या त्यात आता बुध ग्रह देखील धनु राशित प्रवेश करणार असल्यामुळे सूर्य, मंगळ आणि बुध या तीनही ग्रहांच्या संयोगाने त्रिग्रही योग जुळून येत आहे. त्यामुळे या त्रिग्रही योगाचा फायदा हा काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. त्याविषयीची माहिती घेऊ.
त्रिग्रही योगामुळे या राशी करतील प्रगती
1-वृषभ– त्रिग्रही राजयोग हा वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी हा सौभाग्याचा कालावधी देणारा ठरणार आहे. घरातील सदस्य नाही तर बाहेरील लोक देखील तुम्हाला विशेष सहकार्य करतील. जे व्यक्ती नोकरी करतात त्यांच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. काही मालमत्ता खरेदी-विक्रीचे प्लॅनिंग असेल तर ते स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. वडिलांकडून काही मालमत्तेचे फायदे मिळण्याची शक्यता आहे. काही व्यक्ती प्रेम संबंधांमध्ये असतील तर घरच्यांकडून लग्नकरिता परवानगी मिळू शकते.
2- सिंह– त्रिग्रही राज योगामुळे सिंह राशींचे व्यक्ती व्यवसायात आणि करिअरमध्ये अपेक्षित प्रगती करू शकणार आहेत. तसेच मनासारखे यश देखील मिळेल. जे व्यक्ती नोकरीच्या शोधामध्ये असतील त्यांना नोकरी मिळेल. व्यक्ती नोकरी करतात त्यांच्यावर काही मोठी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.
3- तूळ–तूळ राशींच्या व्यक्तींना या कालावधीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कामाच्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. जबाबदाऱ्या पार करण्यासाठी जास्तीचे कष्ट आणि प्रयत्न करावे लागतील. आरोग्य थोड्याफार प्रमाणात अडथळा निर्माण करू शकते.
काही विरोधक देखील अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतील. परंतु कुटुंब व मित्रांच्या मदतीमुळे मोठ्या समस्यांचे देखील निराकरण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबामध्ये आनंदी आनंदाचे वातावरण राहील व कष्टाचे फळ तुम्हाला या कालावधीत मिळेल.
4- धनु– धनु राशींच्या व्यक्तींना या कालावधीत आळस आणि अहंकार सोडणे गरजेचे राहील. नोकरदारांना एखादी जबाबदारी दिली असेल तर ती उत्तम पद्धतीने पार पाडणे गरजेचे राहील. मुलाच्या कर्तृत्वामुळे मोठा मानसन्मान मिळेल.
एखाद्या मोठ्या व्यक्तीची भेट होण्याची शक्यता असून त्यांच्या भेटीचा येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला फायदा होईल. व्यवसायिक लोकांकरिता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा कालावधी खूप शुभ असणार आहे.
5- मीन– मीन राशींच्या व्यक्तींना त्रिग्रही राजयोगामुळे अनेक चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात तसेच कामाच्या ठिकाणी चांगला आदर मिळेल. व्यवसायिकांना चांगल्या पद्धतीची डील देखील मिळू शकते.
बाजारामध्ये झालेली वाढीचा फायदा गुंतवणूकदारांना होऊ शकतो. तुम्हाला प्रियजनांसोबत आनंदाने वेळ घालवण्याच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. काही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी देखील या कालावधीत मिळणार आहे.
( टीप– वरील माहिती ही ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही माध्यम म्हणून काम करत आहोत. याविषयी आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाहीत.)