Varshik Rashifal:- डिसेंबर 2023 हा या वर्षाचा शेवटचा महिना असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्षाचे आगमन होणार असून 2024 या वर्षात आपण पदार्पण करणार आहेत. नक्कीच नवीन वर्षाच्या सुरुवातीची व्यक्तीला उत्सुकता असते व नव्या उमेदीने बऱ्याच गोष्टींना सुरुवात करण्याचा हा कालावधी असतो.
याच दृष्टिकोनातून नवीन वर्षात ग्रहताऱ्यांच्या बाबतीत देखील काही बदल होत असतात व त्याचा परिणाम हा राशींवर होत असतो. त्यामुळे याच दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये कुंभ राशी असणाऱ्या व्यक्तींचे 2024 हे वर्ष कसे जाईल? तसेच प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य कसे असेल? याबाबतची माहिती या लेखात घेणार आहोत.
कुंभ राशींच्या व्यक्तींचे प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य
1- जानेवारी 2024- जानेवारी 2024 मध्ये शनी आणि बृहस्पती यांचा संयुक्त प्रभाव असल्यामुळे प्रगती तसेच उत्साह राहण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी हा महिना खूपच अनुकूल आहे तुमच्या ऑफिस मध्ये तुमची जबाबदारी वाढू शकते.
अति उत्साहामध्ये कुठल्याही चुकीचे काम करण्यापासून स्वतःला वाचवावे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
2- फेब्रुवारी 2024- या महिन्यांमध्ये भरपूर सारे भेटवस्तू आणि पैसे मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यांमध्ये आरोग्यावर थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. लग्न झालेल्या व्यक्तींमध्ये काही छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे थोड्याफार प्रमाणात ताण-तणाव येऊ शकतो.
व्यापारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून काही शुभ समाचार मिळतील. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना खास राहू शकतो. अडकलेले काही व्यवसाय करार असतील तर त्यांना अंतिम स्वरूप या महिन्यात येऊ शकते.
3- मार्च 2024- या महिन्यांमध्ये कुंभ राशींच्या व्यक्तींना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला आवडत्या ठिकाणी नोकरी देखील मिळू शकते. तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणचे सर्व लोक तुमच्या कामामुळे खुश होतील.तसेच तुमच्या प्रतिष्ठेत देखील वाढ होईल.
या महिन्यात तुमचे बरेच ध्येय पूर्ण होतील. या महिन्यात परदेशवारी संभवते. विद्यार्थ्यांसाठी देखील हा महिना खूप यशाच्या दृष्टिकोनातून चांगला आहे. अविवाहित व्यक्ती असतील तर लग्नासाठी प्रस्ताव येतील. परंतु त्यामध्ये निराशा होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्यावसायिक असाल तर या महिन्यात भागीदारीच्या कामांमध्ये सावधानता ठेवावी.
4- एप्रिल 2024- या महिन्यांमध्ये तुम्हाला तुमच्या भावांकडून पूर्ण सहकार्य मिळेल व त्यामुळे तुमचे मन आनंदित राहील. या महिन्यांमध्ये तुमच्या आईचे देखील तुम्हाला सहकार्य राहील व आईच्या मार्गदर्शनाने तुम्ही खूप काहीतरी नवीन काम सुरू करू शकाल.
या महिन्यात तुम्ही चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करू शकतात. आरोग्याच्या बाबतीत त्वचा संबंधी काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींसाठी या महिन्यात विवाहाचे योग आहेत.
5- मे 2024- या महिन्यांमध्ये पैसे गुंतवण्यापासून सावध राहावे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. वडिलांसोबत काही गोष्टींवर मतभेद होऊ शकतात. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव या महिन्यात येतील परंतु लग्न जमणार नाही. व्यवसायामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासोबत काही नवीन संधी देखील मिळेल. फक्त तुम्हाला महिन्यात समजूतदारपणे पुढे जाणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना हवा तेवढा चांगला नाही.
6- जून 2024- कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी जून महिना हा शुभ संदेश आणि काही आनंदाच्या बातम्या घेऊन येणारा महिना आहे. काही दिवसांपासून काही गोष्टीत असलेले मतभेद या महिन्यात संपतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे.
अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. शुभ कार्यक्रमांमध्ये जाण्याचा योग आहे. जर तुम्ही कोणासोबत रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमचे नाते या महिन्यामध्ये आणखीन मजबूत होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रगतीच्या संधी आहेत. या महिन्यात प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
7- जुलै 2024- या महिन्यांमध्ये जर तुम्ही एखादा भागीदारीत व्यवसाय करायचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी योग्य नाही. या महिन्यात कुठलाही मोठा निर्णय घेण्याचे टाळावे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठे बाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे.
वैवाहिक आयुष्यामध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच या महिन्यात तुमच्या वडिलांच्या आरोग्याविषयी काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटची संबंधित व्यक्ती असतील तर काही दिवस वाट पाहणे फायद्याचे ठरेल. या महिन्यात पोटासंबंधीचे काही विकार उद्भवण्याची शक्यता आहे.
8- ऑगस्ट 2024- या महिन्यांमध्ये शेअर बाजारामधून चांगला नफा मिळेल. भाग्य उजळू शकते. तसेच एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची देखील संधी मिळू शकते. या महिन्यात तुम्हाला चांगले पद तर मिळेलच परंतु पगार देखील चांगला मिळेल.
या महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती अनुभवाल. काही नवीन काम सुरू करत असाल तर फायदा होईल. अविवाहित व्यक्तींसाठी या महिन्यात लग्नाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. या महिन्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात नको असलेले खर्च होतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना हवा तेवढा चांगला नाही.
9- सप्टेंबर 2024- या महिन्यांमध्ये व्यवसायाशी संबंधित काही समस्यांना तोंड द्यायला लागू शकते. ग्रहांच्या दृष्टीमुळे जीवनात ताणतणाव तसेच नात्यांमध्ये काही कलह येऊ शकतात. तुमचे विरोधक तुमच्या साधेपणाचा फायदा उठवू शकतात.
अविवाहित व्यक्तींसाठी या महिन्यात लग्नाचा योग आहेत. या महिन्यांमध्ये तुम्ही व्यवसायाच्या संबंधित काही सौदे करू शकतात. या महिन्यात आरोग्याच्या संबंधित काही छोटी मोठी समस्या येऊ शकते.
10- ऑक्टोंबर 2024- या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या विरोधकांना मात देण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यापारामध्ये काही नुकसान होण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुमच्या उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत बघायला मिळतील. नोकरीमध्ये यश मिळू शकते.
जीवनामध्ये काही कठीण प्रसंग येतील. नोकरी पेशा व्यक्तींसाठी काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. या महिन्यात प्रवास संभवतो. परंतु या महिन्यांमध्ये मानसिक स्वरूपात काही बेचैनी येऊ शकते.
11- नोव्हेंबर 2024- राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांना या महिन्यात चांगले पद मिळू शकते. व्यापारामध्ये फायदा होईल. शेअर बाजारातून व म्युच्युअल फंड मधून चांगला फायदा होईल. या महिन्यात नोकरीची चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात शनीची दृष्टी असल्यामुळे कामाच्या ठिकाणी जास्त कष्ट करावे लागतील.बिझनेस च्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे.
12- डिसेंबर 2024- या महिन्यामध्ये तुमचे विचार सकारात्मक राहतील व यामुळे तुम्हाला भाग्यशाली आणि उत्साही असल्याचे जाणवेल. नको त्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे. कधी वाहन खरेदी करायची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल.
तुमच्या जीवनसाथीकडून तुम्हाला काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. वाईट संगतीपासून स्वतःला वाचवावे. काही जोखिमयुक्त कामे असतील तर त्यापासून दूरच राहावे. नोकरीमध्ये काही आव्हानांना तोंड द्यायला लागू शकते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला आहे.