राशीभविष्य

Weekly Horoscope: ‘या’ राशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये मिळेल खूप चांगली बातमी! विरोधकांपासून राहावे सावधान

Weekly Horoscope:- डिसेंबर 2023 हा या वर्षाचा शेवटचा महिना असून या महिन्यांमध्ये अनेक ग्रह आणि ताऱ्यांच्या संबंधित बदल होण्याचा संभव आहे. आणि ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत आहेत. जर आपण डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे चार ते दहा डिसेंबर हा कालावधी पाहिला तर काही राशीच्या लोकांसाठी खूप चांगल्या बातम्या मिळणार असल्याची शक्यता आहे तर काहींनी थोडीशी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

जर आपण राशीनुसार विचार केला तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीचा हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जरा संमिश्र स्वरूपाचा आहे तर काही चांगल्या बातम्या देखील देणार आहे. याचा अनुषंगाने आपण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील यासंबंधीचे राशिभविष्य जाणून घेणार आहोत.

 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा?

1- नोकरीमध्ये प्रमोशन होण्याचा योग या आठवड्यामध्ये ज्या व्यक्तींची राशी वृश्चिक आहे त्यांना नोकरीमध्ये बढती मिळण्याचे योग येण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर दूरच्या प्रवासाला किंवा परदेश दौऱ्यावर देखील जाण्याची संधी मिळू शकते. उद्योग व्यवसायामध्ये प्रगतीसह लाभाची संधी मिळणार आहे. या सप्ताहाच्या मध्यावधी कालावधीत प्रेम प्रकरणांमध्ये जवळीकता येईल. राजकारणात असेल तर तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करू शकाल.

सासरच्या लोकांकडून देखील चांगली बातमी मिळेल. तसेच या आठवड्याच्या शेवटी काही नको ते खर्च करावे लागतील. तसेच तुम्हाला नको असलेला प्रवास देखील करावा लागण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी दारू पिऊन वेगाने गाडी चालवणे टाळावे. नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. राजकारणामध्ये तुमचे विरोधक काही कट रुचू शकतात व तुम्हाला अडकावू देखील शकतात.

 2- आर्थिक दृष्टिकोनातून कसा राहिल आठवडा?- या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मित्रांकडून पैसे वा काही अनमोल भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर तुमचे काही पैसे हरवलेले असतील तर ते देखील परत मिळू शकतात. नोकरीमध्ये तुमच्या अधिकाऱ्यांशी जवळीक लाभण्याची शक्यता आहे. जे व्यक्ती सामाजिक कार्याशी संबंधित आहेत अशा लोकांचा समाजामध्ये सन्मान वाढण्यास मदत होईल.

प्रवासादरम्यान संगीत आणि गाण्यांसोबत मनोरंजनाचा खूप आनंद झाला. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक फायदा होईल. या आठवड्याच्या मध्यावधीत घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वस्तूंची वाढ होईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यावसायिकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मध्ये काही वाद असतील तर तुमचा विजय होण्याची शक्यता आहे.

या आठवड्याच्या शेवटी कुटुंबामध्ये अशी काही घटना घडू शकते यावर तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. तसेच व्यवसाय असेल तर त्यामध्ये काही सरकारी अडथळे येण्याची शक्यता असल्याने पैसे देऊनच ते अडथळे दूर करता येतील. कुटुंबामध्ये काही शुभ कार्य पूर्ण होतील.

राजकारणामध्ये असाल तर तुम्हाला महत्त्वाचे पद मिळेल व ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नसेल. जे व्यक्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करतात अशा लोकांना महत्त्वाच्या मोहिमेची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या मध्यावधीत कुटुंबासोबत एखाद्या चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्याचा योग आहे. आठवड्याच्या शेवटी संशय आणि गोंधळामुळे संबंधांमध्ये तणाव येऊ शकतो.

3- आरोग्य कसे राहील?- आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या आरोग्य चांगले राहील व ते सकारात्मक अशा ऊर्जेने भरले जाईल. या कालावधीत तुम्ही अतिशय आनंदी व शांत रहा. परंतु जे व्यक्ती हृदयविकाराने त्रस्त आहेत अशांना जास्तीची काळजी घ्यावी लागेल. तसंच तुम्ही एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असाल तर तुम्हाला या आठवड्यात आराम मिळेल. या आठवड्याच्या शेवटी नको असलेल्या सहलींवर जाणे टाळावे. नाहीतर तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता आहे व तुमची तब्येत बिघडू शकते.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts