राशीभविष्य

तुमच्या राशीनुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? कोणत्या राशीला ठरेल कोणता रंग शुभ?

Lucky Colour to Cloth For Zodiac Signs:- येत्या पाच दिवसांमध्ये नवीन वर्षाचे आगमन होईल व या नवीन वर्षाच्या आगमनाच्या आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे व प्रत्येकजण आता नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्याच्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला प्लॅनिंग करताना दिसून येत आहेत.

नवीन वर्ष म्हटले म्हणजे एक नावीन्यतेचा ध्यास तसेच अनेक नवनवीन गोष्टी करण्याचा संकल्प करण्याचा कालावधी समजला जातो. नवीन वर्ष खास पद्धतीने सेलिब्रेट करता यावे म्हणून अनेकजण आधीच तयारी सुरू करतात.

या सगळ्या नवीन वर्षाच्या स्वागताच्या धामधुमीत ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राशीनुसार विशिष्ट रंगाचे कपडे परिधान करणे अधिक शुभ मानले जाते. त्यामुळे येणाऱ्या या 2025 च्या पहिल्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघू.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत?

1- मेष राशी- या राशीच्या व्यक्तींसाठी लाल रंग खूप शुभ मानला जातो व त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी एक जानेवारीला लाल रंगाचे कपडे परिधान करणे फायद्याचे ठरेल. मात्र काळ्या रंगाचे कपडे या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी परिधान करू नयेत.

2- वृषभ राशी- या राशीच्या व्यक्तीने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पांढरे, गुलाबी किंवा मलई रंगाचे कपडे घालावेत. या राशीच्या व्यक्तींसाठी पांढरा रंग हा खूप शुभ मानला जातो.

3- मिथुन राशी- या राशींच्या व्यक्तींनी एक जानेवारी 2025 रोजी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ ठरेल. कारण हिरवा रंग या राशीसाठी शुभ मानला जातो.

4- कर्क राशी- या राशीच्या व्यक्तींनी एक जानेवारी 2025 या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे या राशींच्या व्यक्तींचे भाग्य जागृत होते व अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यामध्ये यश मिळते.

5- सिंह राशी- या राशींच्या व्यक्तींनी एक जानेवारी 2025 रोजी पिवळे, सोनेरी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.त्यामुळे लक्ष्मीची विशेष कृपा कायम राहण्याची शक्यता आहे.

6- कन्या राशी- या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी हलका निळा, फिकट गुलाबी किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत.

7- तूळ राशी- नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे फायदेशीर आणि शुभ ठरेल.

8- वृश्चिक राशी- या राशीच्या व्यक्तींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाल रंगाचे कपडे घालावेत. ज्योतिष शास्त्रानुसार हा रंग या राशींच्या व्यक्तींसाठी शुभ मानला जातो.

9- धनु राशी – नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी धनु राशींच्या लोकांनी पिवळे, केशरी किंवा लाल रंगाचे कपडे घालावेत. हे तीन रंग या राशीसाठी शुभ मानले जातात.

10- मकर राशी- या राशीच्या व्यक्तींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालावेत. यामुळे यशाच्या मार्गामध्ये काही अडथळे असतील तर ते दूर होतील.

11- कुंभ राशी- कुंभ राशींच्या व्यक्तींनी जांभळा, निळा अशा रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या रंगाचे कपडे परिधान करणे फायद्याचे ठरेल.

12- मीन राशी- या राशींच्या व्यक्तींनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते. हा रंग खूप सकारात्मक परिणाम देणारा मानला जातो.

( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहिती विषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा अथवा या माहितीचे समर्थन करत नाही.)

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts