भारत

‘हा’ आहे देशातील पहिला एक्सप्रेस वे, ज्यावर उतरतील हेलिकॉप्टर; गाड्यांमध्ये हॉर्न ऐवजी वाजेल सतार आणि शहनाई

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मोठमोठ्या रस्ते प्रकल्पांचे कामे सध्या सुरू असून या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाची शहरे एकमेकांशी कनेक्ट केले जात आहेत व अशा शहरांमधील प्रवासाचे अंतर देखील आता यामुळे भविष्यकाळात कमी होण्यास मदत होणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे. महत्वाचे म्हणजे उभारण्यात येत असलेल्या या नवीन एक्सप्रेस वे मध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने प्रवास देखील सुखद आणि सुलभ होण्यास यामुळे मदत होणार आहे.

जर पाहिले तर देशात बांधण्यात येत असलेल्या सगळ्या एक्सप्रेस वे मध्ये दिल्ली ते मुंबई एक्सप्रेस वे हा एक महत्त्वाचा एक्सप्रेस वे असून हा देशातील एकमेव असा एक्सप्रेस वे असणार आहे की ज्यावर हेलीपॅड बांधले जाणार आहेत. हेलीपॅड बांधण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

या एक्सप्रेस वे वर तब्बल 12 हेलिपॅड बांधले जातील व याशिवाय या एक्सप्रेस वे वर वन्यजीव कॉरिडॉर देखील बांधले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या एक्सप्रेस वे व्यतिरिक्त वन्य प्राण्यांसाठी वेगळे रस्ते या ठिकाणी असणार आहेत. तसेच या एक्सप्रेस वे वरून जाणाऱ्या वाहनांच्या कर्कश हॉर्न आणि सायरन यामुळे प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून इतर वाद्ययंत्रांचा वापर करण्यात येणार आहे.

 दिल्लीमुंबई एक्सप्रेस वे वर बांधण्यात येणारा बारा हेलिपॅड

हा देशातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असणारा असून यावर आता बारा हेलिपॅड बांधण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला गेला आहे. वैद्यकीय आणीबाणी आणि लष्करी कामाकरिता प्रामुख्याने यांचा वापर केला जाणार आहे.

साधारणपणे एक हजार तीनशे पन्नास किलोमीटरचा हा एक्सप्रेस वे असून देशातील चार राज्यांमधून जाणार आहे. विशेष म्हणजे जेव्हा पूर्ण क्षमतेने हा एक्सप्रेस सुरू होईल तेव्हा दिल्ली आणि मुंबईचा प्रवास 24 तासांऐवजी अवघ्या साडेबारा तासांवर येणार आहे.

 या ठिकाणी बांधले जातील हेलिपॅड

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे RO( जयपुर)चे महाव्यवस्थापक पवन कुमार यांनी याबद्दल माहिती दिली की केंद्र सरकारच्या माध्यमातून राजस्थान मधील परिसरातील सर्व बारा हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत व यातील सर्वात जास्त हेलीपॅड सवाई माधोपुर जिल्ह्यामध्ये बांधले जाणार आहेत. याशिवाय दौसा जिल्ह्यात चार आणि कोटामध्ये दोन अशी हेलिपॅडची संख्या असणार आहे.

तसेच देशातील सर्व प्रमुख महामार्गांवर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती करिता हेलीपॅड बांधले जातील असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी सांगितले.

या महामार्गाचे राजस्थान राज्यातील अंतर 374 किलोमीटर असून तो एकूण सात जिल्ह्यातून जाणार आहे. या ठिकाणी तीन जिल्ह्यांमध्ये हेलिपॅड उभारण्याची तयारी सुरू असून एखादा अपघात झाल्यास जखमींना एअरलिफ्ट करण्यासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे.

 मुंबई ते दिल्ली दरम्यान लागतील पाच वन्यजीव कॉरिडोर

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर पाच मोठे वन्य जीव अभयारण्य देखील लागतात व या अभयारण्यांमधून हा मार्ग जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुकुंदरा राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सरीस्का व्याघ्र प्रकल्प इत्यादी मोठ्या जंगलांचा देखील समावेश असणार आहे.

या ठिकाणी गाड्यांचे हॉर्न आणि सायरन देखील बदलण्यात येणार असून यामुळे वन्य प्राण्यांना त्रास होऊ नये हा उद्देश आहे. या ऐवजी त्या ठिकाणी भारतीय वाद्य जसे की सितार, शहनाई किंवा इतर वाद्यांचा समावेश असू शकतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts