भारत

Changes from today : गॅसच्या किमतीसह 1 मार्चपासून झाले हे 5 मोठे बदल; जाणून घ्या खिशावर काय होणार परिणाम

Changes from today : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आजही घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांना जास्तीच्या दराने गॅस सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.

आज फक्त गॅसच्या किमतीचं नाही तर प्रमुख ५ बदल झाले आहेत. त्याचा प्राणिमा देशातील नागरिकांच्या खिशावर होणार आहे. 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 350.50 रुपयांनी वाढल्या आहेत तर घरगुती 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढल्या आहेत.

इतर कोणते बदल झाले

कर्ज दर

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने अनेक बँकांनी ग्राहकर्जासह इतर कर्जाचे व्याजदरही वाढवले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया देखील कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. ग्राहकर्जासह इतर कर्ज देखील महाग होणार आहेत.

ट्रेनच्या वेळेत बदल

उन्ह्याळाच्या सुट्ट्या सुरु झाल्या असल्याने रेल्वे विभागाकडून भारतीय रेल्वे ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करू शकते. १ मार्चपासून हजारो प्रवासी गाड्या आणि ५ हजार मालवाहू गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडिया नियम

आजकाल लाखो तरुण सोशल मीडियावर सक्रिय आहेत. तसेच सरकारकडून सोशल मीडियासाठी सतत अनेक नियम आणले जात आहेत. नवीन भारतीय कायद्यांनुसार आता ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया साइट्सचे पालन करणे आवश्यक आहे.

हा नवा नियम मार्चपासून लागू होईल आणि धार्मिक हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर लागू होईल. ज्या पोस्टमध्ये तथ्यात्मक चुका आहेत त्यांमुळे गुन्हेगारांना दंड देखील होऊ शकतो.

बँक सुट्ट्या

या महिन्यात बँकांना तब्बल १२ दिवस सुट्ट्या असल्याने अनेकांच्या आर्थिक कामकाजावर परिणाम होणार आहे. त्यामुळे जर या महिन्यात तुमचे बँकेमध्ये काम असेल तर बँकांच्या सुट्ट्या पाहून बँकेतील कामाचा दिवस ठरवावा.

काशी विश्वनाथ मंदिराची आरती महागणार

मंगला आरतीच्या तिकीटाची किंमत 350 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत वाढली आहे. सप्त ऋषी आरती, शृंगार भोग आरती आणि मध्यान्ह भोग आरतीचे तिकीट एकाच वेळी 180 रुपयांवरून 300 रुपये असेल. तिकिटाचे नवे दर १ मार्च म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts